दिव्यातील मातोश्री संकुलात रस्त्यावर उकीरडा!

ठाणे : एकीकडे मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे घडविण्यासाठी ठामपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहर स्वच्छतेवर मोठा भर दिल्याचे दिसत असताना दुसरीकडे ठामपाच्याच हद्दीत असलेल्या दिवा प्रभाग समितीचे सफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.


दिव्यातील मातोश्री संकुलाच्या दारात ओरसिट अपार्टमेंटच्या मागील बाजूस रस्त्यावर गेली अनेक दिवस रस्त्यातच कचरा टाकण्यात येत आहे. यामुळे रस्त्यावर अस्ताव्यस्त कचरा साचल्याने रहिवाशांना नाक दाबून घाणीतून वाट काढावी लागत आहे.


अनेक वेळा याबाबत तक्रारी करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रहिवाशांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी मातोश्री संकुलातील रहिवाशांनी केली आहे.

Comments

Mahesh kambli    January 29, 2023 12:48 PM

दिव्यातील मातोश्री नगर येथील रस्त्यावर लोक घनकचरा टाकत आहे याबद्दल न्युज आपण पेपर मध्ये टाकली, पण ह्याची दुसरी बाजू पडताळून पहावी, माजी उपमहापौर मा. रमाकांत मढवी साहेब तसेच दिव्यातील सर्व नगरसेवक निधीतून येथील रोड सिमेंट काँक्रीट करण्यात आला आहे. ह्यापूर्वी या रोडवरून कोणीही जाऊ शकत नव्हते. तसेच मातोश्री नगर मागील चाळीतील लोक येथे कचरा टाकत असून सतत तीन-चार वेळा कचरा साफ करण्यात आला आहे. लोकांना अडवूनही लोक कचरा टाकत आहेत. उलट उत्तरे देत आहेत. तिथे जवळ लहान मुलांचे क्लास चालू असून 50 - 60 लहान मुलं तिथे येतात. सकाळी 7.30 am वाजता ठाणे महानगरपालिका घनकचरा गाडी येते, तरी पण लवकर कामावर जाणारे लोक येथे कचरा टाकत आहेत. ह्याला जबाबदार कोण? येथे कचरा टाकू नये म्हणून सतत साफसफाई करून तसेच ग्रुपवर लोक विनंती करत आहेत, तरीही काही लोक सुधारत नाहीत. उलट उत्तरे देऊन पुढे जातात. अशा लोकांचे करायचे काय? ह्याबद्दल आपण स्वतः येऊन उलट पडताळणी करावी, ही विनंती.

Add Comment

भाजप-राष्ट्रवादीची युती, एकनाथ शिंदे पडले एकाकी!

बदलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून मागील पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या

मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनरचा अपघात, चालक जखमी

ठाणे : कॅडबरी जंक्शन उड्डाणपुलाजवळ कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला. जखमी चालकाला ठाणे

डांबरीकरणासाठी शहाड पूल पुन्हा बंद

वाहतूक बंदीमुळे वाहनचालकांना २० दिवस मनस्ताप उल्हासनगर : कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पूल

कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील २७ गावांतील रस्ते पथदिव्यांनी प्रकाशमय

कल्याण  : २०२४ मध्ये शासनाने १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार २७ कोटी निधी मंजूर केला. त्यामुळे या

Thane Ring Metro : ठाणेकरांसाठी खुशखबर! ठाण्यात सुरू होणार रिंग मेट्रो; २२ स्थानकं, २९ किमीचा रूट, जाणून घ्या सविस्तर मार्ग!

रिंग मेट्रोमुळे प्रवास होणार वेगवान आणि सुरक्षित ठाणे : ठाणेकरांसाठी (Thane Residents) एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे!

Thane News : ठाणे हादरलं! 'जीवंत सोडणार नाही' धमकी दिली अन् १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीला... बंद घरात नेमकं काय घडलं?

ठाणे : प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या १७ वर्षीय मैत्रिणीला पेटवून दिल्याचा अत्यंत