भिवंडी : नागाव परिसरात तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून निर्घुण हत्या झाल्याच्या घटनेने भिवंडी पुन्हा एकदा हादरली आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हृदयद्रावक घटना घडली. शहरातील मागील चार दिवसात घडलेल्या दुसऱ्या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पुढील तपासासाठी पोलीस पथक तैनात केले आहे.
आई वडील मजुरी कामावर गेले असताना एका अज्ञात नराधमाने संधी साधत चिमुरडीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. परिसरात मुलीचा शोध घेऊनही ती न सापडल्याने सायंकाळी आठ वाजता महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. बुधवारी सकाळी त्याच परिसरातील एक चाळीच्या पहिल्या मजल्यावर अडगळीच्या खोलीत चिमुरडीचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान शांतीनगर पोलिसांनी संपूर्ण परिसरात आरोपीचा शोध सुरू केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबई जे जे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी चाळीत राहणाऱ्या कुटुंबियांची माहिती चाळ मालकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन केले आहे. तसेच सदर माहिती न देणाऱ्या चाळ मालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे .
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…