वांद्रे येथे बेस्ट बसला आग

मुंबई : कुलाब्याहुन सांताक्रूझकडे जाणाऱ्या सी ५१ क्रमांकाच्या बसला बांद्रा येथे शॉर्ट सर्किटमुळे आज दुपारी आग लागली. बस चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांनी वेळीच सावधानता दाखवल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.


बेस्टची सी ५१ ही बस इलेक्ट्रिक हाऊस ( कुलाबा आगार ) ते सांताक्रूझ आगार दरम्यान जात होती. मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट या कंत्राटदाराची ही सीएनजी बस ७८७६ (एम एच ०१ डी आर - ७१३७) आज दुपारी सव्वा एक वाजता वांद्रे (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्ग येथील सिग्नल जवळ आली असता या बसच्या गियर बॉक्स जवळ स्पार्क होऊन शॉर्टसर्किटमुळे बस गाडीने पेट घेतला. यावेळी बस वाहक व चालकाने तातडीने बस गाडीतील २० ते २५ प्रवाशांना बस मधून खाली उतरवले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.


सदर बस मधील कोणीही जखमी झाले नाही. आगीने पेट घेतल्याने बस पूर्णपणे जळाली असल्याचे बेस्ट अधिकाऱ्यांनी सांगितले. आग विझवल्यानंतर मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्टचे अधिकारी व बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सदर बसची पाहणी केली.

Comments
Add Comment

“जनतेशी घट्ट नाळ जोडलेले नेतृत्व हरपले” फडणवीसांकडून एक्सवर कर्डीले यांना श्रद्धांजली

मुंबई : राहुरीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचे अल्पशा आजराने निधन झाले. यांच्या आकस्मिक

वेध निवडणुकीचा : उत्तर मुंबईत भाजपाचे मिशन ३२

मुंबई (सचिन धानजी) : उत्तर मुंबई हा भाजपाचा गड मानला जात असला तरी मागील आगामी महापालिका निवडणुकीच्या

राष्ट्रीय महामार्गावर ‘राजमार्गयात्रा’अॅप सोयीस्कर

मुंबई  : राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासादरम्यान पेट्रोल पंप, टोल प्लाझा, विश्रांती केंद्र किंवा हॉस्पिटल कुठे

सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी बृहद् आराखडा

तीन जिल्ह्यांच्या ऐतिहासिक प्रसिद्धीसाठी ‘डीएमओ’ निर्माण करणार मुंबई : राज्यातील समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन

सोलापुरातील चार माजी आमदारांचा भाजपप्रवेश; फडणवीसांच्या बंगल्यावर रात्री गुप्त खलबतं

सोलापुर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

'डिजीटल अरेस्ट' दाखवून उद्योजकाकडून ५८ कोटी रुपये लुटले

मुंबई : मुंबईत उद्योजकाला 'डिजीटल अरेस्ट' दाखवून ५८ कोटी रुपये लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर प्रकरणी