नाशिक : नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक रोडपासून काही अंतरावर राजगुरू नगर-नाशिक या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला झालेल्या विचित्र अपघातात (Accident in Nashik) एसटी बस जळून खाक झाली. तर या अपघातात २ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला.
एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने शिंदे पळसे गावाच्या हद्दीत बसने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक आहे. आज दुपारी १२.३० वाजता ही दुर्घटना घडली असून नाशिक शहरापासून केवळ ६ ते ७ किमी अंतरावरील हा अपघात झाला आहे.
अपघातानंतर घटनास्थळावरच बसला भीषण आग लागली. त्यामध्ये बस संपूर्ण जळून खाक झाली. या घटनेनंतर अपघातस्थळी अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका दाखल झाली असून आठ ते दहा लोकांना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून बघ्यांचीही गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
या बस अपघातात हर्षदा मंगेस पोंदे, संगमनेर, रुपाली सचिन दिवटे, अकोले, समृद्धी सचिन दिवटे, सईदा इनामदार, संगमनेर, मुस्तफा शेख, संगमनेर, नसमा जहाँगिरदार, संगमनेर, औवेस अहमद, धारावी मुंबई, सिताराम देवराम कुरणे, सिकर हे प्रवासी जखमी झाले आहेत.
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…