देवगड (प्रतिनिधी) : ‘महाराष्ट्रात प्रकल्प येत नाहीत अशी बोंब मारायची आणि आलेल्या प्रकल्पांना विरोध करायचा ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची नीती आहे’, अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल केला. ‘प्रकल्प पळवतात म्हणून बोंब मारायची आणि केंद्राचे जे प्रकल्प आले आहेत त्याला विरोध करायचा अशी नीती येथील खा. विनायक राऊत यांची असून आदित्य ठाकरे यांनी विनायक राऊत यांना बैठकीला उपस्थित राहा असे सांगण्याची गरज होती असे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र, आमदार राजन साळवी हे या बैठकीला उपस्थित राहिले व त्यांचे आपण स्वागत करतो असे ते म्हणाले.
आ. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देवगड येथे बारसू येथील रिफायनरीबाबत देवगड तालुक्याला होणारा फायदा याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. माजी आ. अजित गोगटे, भाजप पदाधिकारी बाळ खडपे, प्रकाश राणे, संदीप साटम, योगेश पाटकर, दयानंद पाटील, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
‘बारसू रिफायनरी जरी रत्नागिरी जिल्ह्यात होणार असली तरी ड्राय पोर्ट तसेच इतर अनेक प्रकल्प हे गरजेचे असतात. त्यासाठी देवगड तालुक्याचा प्राधान्याने विचार होणार आहे. आपण याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे बारसू रिफायनरीच्या विकासाचा लाभ रोजगार व इतर दृष्टीने देवगडलाही मिळणार आहे हे निश्चित आहे. याबाबत देवगडवासीयांनी आपल्या मनात कोणताही किंतू बाळगू नये’, अशी माहितीही आ. नितेश राणे यांनी दिली. यासाठी आवश्यक पाठपुरावा आपण करणार असून देवगड तालुक्यातील ज्या जागा आहेत त्या जागांवर प्रकल्पाला आवश्यक असलेल्या गोष्टी उभ्या राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख केला. घटना घडली त्यावेळी उद्धव ठाकरे सरकार होते. त्यामुळे त्यांनी पुरावे अशा प्रकारे नष्ट केले असले पाहिजेत की ते मिळूच नयेत. खरे म्हणजे पुरावे कसे नष्ट करावे याचे ट्रेनिंग त्यांच्याकडूनच घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सीबीआयला नेमके काय सापडले? त्यांनी शवविच्छेदन अहवाल पाहिला का? त्यामध्ये काय लिहिले आहे, याची सविस्तर माहिती घ्यावी लागेल. दिशा प्रकरणात अनेक पुरावे नष्ट करण्यात आले आहेत. त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज मिळत नाहीत हे लक्षात घेता यामध्ये दिशा सालीयन हिच्या हत्येचा संशय कायम आहे आणि आपण या मतावर ठाम आहोत, असेही आ. नितेश राणे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे हे बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या पुत्रांची भेट घेतात. याबाबत बोलताना आ. नितेश राणे म्हणाले की, लालूप्रसाद यादव यांनी राम जन्मभूमी संदर्भातील निघालेल्या रथयात्रेला विरोध केला होता. त्यांच्याच पुत्राला आदित्य ठाकरे भेटायला जात असतील, तर प्रखर व हिंदुत्ववादी असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे नातू हिंदुत्ववादी कसे म्हणून घेतात? याचे उत्तर त्यांनीच दिले पाहिजे असेही म्हणाले.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…