मुंबई : ‘सत्ता असताना बाळासाहेब नाही आठवले, सत्ता गेली की लगेच बाळासाहेब आठवले’, असे दोन फोटोसह ‘सत्य’ असे ट्विट भाजप आमदार नितेश राणे यांनी करत उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे. बाळासाहेबांना यांची केव्हा आठवण येते हे सुद्धा त्यांनी या फोटोमधूनच निदर्शनास आणले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आणि खासदार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उद्धव ठाकरेंच्या गटातील ‘बडव्यां’वर जोरदार टीका करत आहेत. मात्र या टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ही मुलाखत शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतली असून या मुलाखतीचा टीझर सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. मात्र हा टीझर पाहून काही नेटकऱ्यांनी उलट या मुलाखतीचीच खिल्ली उडवली आहे.

“तुम्ही म्हणजेच महाराष्ट्र का? घरातल्या भांडणातही तुम्हाला महाराष्ट्राचा अपमान दिसतो का?” असे प्रश्न विचारत काही नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत.