अनाथाश्रमात राहिलेला मुलगा झाला नेदरलँडचा महापौर, आईला शोधत ४० वर्षांनी नागपूरला आला

नागपूर : नेदरलँड्समधील हीमस्टेडचे ​​महापौर फाल्गुन बिनेन्डिज्क तब्बल ४० वर्षांनंतर जन्मदात्या आईचा शोध घेत नागपूरमध्ये पोहोचले आहेत.

फाल्गुन बिनेन्डिज्क यांचा जन्म १० फेब्रुवारी १९८५ रोजी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये झाला. त्यांची आई त्यावेळी फक्त २१ वर्षांची आणि अविवाहित होती. सामाजिक कलंक आणि बदनामीच्या भीतीने या मातेने तीन दिवसांचा मुलगा नागपूरच्या मातृसेवा संघाला सोपवला. यथावकाश एका डच दांपत्याने या मुलाला दत्तक घेतले. ते मुलाला घेऊन नेदरलँडला गेले. तिथेच मुलाचं शिक्षण आणि पुढील कारकिर्द घडली.

नेदरलँड्समध्ये यशस्वी जीवन जगून आणि राजकीय मान्यता मिळवूनही, फाल्गुनला त्याच्या जन्मदात्या आईविषयी प्रचंड ओढ आहे. याच कारणामुळे फाल्गुनने त्याच्या मुलीचे नाव आईच्याच नावावरून ठेवले. आता फाल्गुन नागपूरमध्ये आईचाला भेटण्यासाठी आला आहे.

फाल्गुन आतापर्यंत दोन वेळा भारतात आला आहे. ही त्याची तिसरी भारत भेट आहे. याआधी २०१७ आणि २०२४ मध्ये फाल्गुन भारतात आईचा शोध घेण्यासाठी आला होता. तो तो मातृसेवा संघाच्या माजी अधीक्षक मंगला भुसारी यांनाही भेटला. तब्बल ४० वर्षांपूर्वी मंगला भुसारी यांनीच अनाथ मुलाचे नाव "फाल्गुन" ठेवले होते. ज्या महिलेने त्याचे नाव ठेवले होते तिला भेटणे फाल्गुनसाठी खूप भावनिक होते, जरी त्याची आई कुठे आहे हे अजूनही एक रहस्य आहे.

मातृसेवा संघाच्या रजिस्टरमध्ये फाल्गुनची अचूक जन्मतारीख आणि आईच्या नावाचा उल्लेख आहे. पण त्यावेळी फाल्गुनच्या आईने सामाजिक भितीपोटी घराचा पत्ती व्यवस्थित दिलेला नाही. नागपूर जिल्हा दंडाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि महिला आणि बाल कल्याण विभागाचे पथक जुने रुग्णालय आणि नागरी संस्थांच्या नोंदींची तपासणी करत आहेत.
Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम