एकनाथ शिंदे आगे बढो…हम तुम्हारे साथ है…!

Share

ठाणे (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे आगे बढो…हम तुम्हारे साथ है…! अशा घोषणा देत ठाण्यात नगरसेवक आणि शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या घराबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शिंदे गटाकडून ठाण्यात ‘निर्णय तुमचा पाठिंबा आमचा’ असे फलकही फडकविण्यात आले. दरम्यान मुंबई-ठाण्यासह राज्यभरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना पाठिंब्याचे बळ देण्याचे काम शिवसेनेचे सामान्य कार्यकर्ते पदाधिकारी आमदार करत असताना शनिवारी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे मैदानात उतरले.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निर्वाणीचा इशारा दिला. ‘आमदारांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात येत आहे. आमदारांच्या पोस्टर्संना काळे फासण्यात येत आहे. महाराष्ट्रात येऊ द्या, अशी धमकी दिली जात आहे. आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करू नका. धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. धर्मवीर दिघे आणि एकनाथ शिंदेच्या शिकवणीमुळे अजून शांत आहोत,’ असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात पुकारलेल्या बंडानंतर शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेचे तब्बल ४६ आमदार आपल्यासोबत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदारांचे समर्थन असल्यामुळे शिवसेनेकडे फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आमदार राहिले आहेत. असे असतानाच आता शिवसेनेच्या ठाण्यातील नगरसेवकांनी आणि शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या घराबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

यावेळी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने हातात बॅनर घेऊन शिंदे समर्थक रस्त्यावर उतरले होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदे यांनी सांगितले, आज महाराष्ट्रात मोठी घडामोड घडत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि अपक्ष १० आमदार आहेत. ही इतिहासामधली पहिली मोठी घटना असेल, जेव्हा इतक्या मोठ्या संख्येने आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

मी या ठिकाणी सामान्य कार्यकर्ता नाही तर आमदारांच्या अडचणी सांगत आहे. आमदारांना निधी मिळत नाही. त्यांच्या विधानसभा क्षेत्रात भूमिपूजन हे राष्ट्रवादीचे पालकमंत्री करतात. आम्हाला जर निधी मिळाला, तर ते थांबवण्याचे काम राष्ट्रवादीचे पालकमंत्री करतात. अशा परिस्थितीत आम्ही काम करू शकत नाही. जर आमची सत्ता असून आम्ही लोकांना न्याय देऊन शकत नाही, तर सत्तेचा फायदा काय असा प्रश्न त्यांनी केला.

५० नगरसेवकांचे समर्थन

एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण उभे केल्यानंतर शिवसेनेतील आमदारांचा एक गट त्यांच्या बाजूने आला. त्यामुळे शिवसेनेसाठी हा फार मोठा धक्का आहे. त्यानंतर आता ठाणे महापालिकेतील ५० नगरसेवकांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ उतरण्याचे ठरवले आहे. ठाण्यातील घोडबंदर, वागळे, कोपरी या भागातील शिवसैनिक एकत्र येऊन त्यांनी शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर एकत्र येऊन शिंदे समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

Recent Posts

पंतप्रधान मोदी २२-२३ एप्रिलला सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…

6 minutes ago

बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…

37 minutes ago

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

1 hour ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

2 hours ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

3 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

5 hours ago