‘पोलीस वसाहतींतील इमारती दुरुस्त करा’

ठाणे (प्रतिनिधी) : शहरातील पोलीस वसाहतींच्या इमारतींची परिस्थिती गंभीर झाली आहे. तातडीने त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी ठाण्यातील भाजप आमदार संजय केळकर यांनी शासनाकडे केली.


आमदार संजय केळकर यांनी नवीन पोलीस वसाहत क्र. १ ते ६ तसेच इमारत ए, बी, सी या इमारतींची पाहणी करून पोलीस कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, माजी नगरसेवक संतोष साळवी आदी उपस्थित होते. वर्षांनुवर्षे इमारतींची दुरुस्ती केली नाही, छतावर पत्रे टाकले नाहीत, त्यामुळे भिंती, सज्जे यांची परिस्थिती नाजूक असल्याचे निदर्शनास आले.


स्ट्रक्चरल ऑडिट त्रयस्थ संस्थेमार्फत पुन्हा करण्याची या ठिकाणी गरज आहे. रहिवाशांच्या मागणीप्रमाणे त्वरित दुरुस्ती करून रहिवाशांना त्याच ठिकाणी राहायला मिळेल, अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, असे संजय केळकर यांनी सांगितले.


सातत्याने निधीची मागणी करूनही तो मिळत नसल्याने पोलीस वसाहतीतील शेकडो कुटुंबांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. या प्रकारास ठाकरे सरकारच जबाबदार असल्याचा पुनरुच्चार केळकर यांनी केला. मागील फडणवीस सरकारच्या काळात आमदार संजय केळकर यांनी दुरुस्तीसाठी आठ कोटींचा निधी मंजूर करवून दुरुस्ती करून घेतली, याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.

Comments
Add Comment

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.

भिवंडी-निजामपूर पालिका आणि एमसीईडी यांच्यात सामंजस्य करार

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर पालिका आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्यात शहरातील महिलांसाठी

भाईंदरमध्ये मराठी माणसाला घर देण्यास नकार !

बिल्डर लॉबीची अजब वागणूक भाईंदर : मराठी विरुद्ध अमराठी वादाचे भाईंदरमध्ये पडसाद उमटले आहेत. भाईंदरमध्ये एका

कल्याण - डोंबिवलीतील विकासकामांसाठी निधी उपलब्ध

डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीतील कामांना गती देण्यासाठी राज्य नगर विकास विभागाच्या माध्यमातून तब्बल १६ कोटी

MCCL : डोंबिवलीत क्रिकेटचा महाधमाका!

डोंबिवली - डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर