Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

कोल्हापूर महापालिकेसाठी प्रभाग आरक्षण जाहीर

कोल्हापूर महापालिकेसाठी प्रभाग आरक्षण जाहीर

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, त्याचबरोबर सर्वसाधारण प्रभागातील महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीसाठी ३१ प्रभागातील ९२ जागांसाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे.


महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. मनपाची प्रभाग रचना त्रिसदस्यीय असून ९२ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. प्रभाग रचना करताना लोकसंख्येचा विचार करण्यात आला आहे. दरम्यान, निश्चित करण्यात आलेल्या सर्व ३१ प्रभागामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील १ महिला आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यानुसार ४६ जागा महिलांसाठी राखीव असतील.


अनुसूचित जाती महिलांसाठी


प्रभाग क्रमांक - ७ अ, ४ अ, ९ अ,१३ अ, २८ अ, ३० अ


अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग


प्रभाग क्रमांक - १५ अ, १९ अ, २१ अ, ५ अ, १ अ, १८ अ


सर्वसाधारण साधारण महिला आरक्षित प्रभाग


प्रभाग क्रमांक - १ ब, २ ब, ३ अ, ४ ब, ५ ब, ६ अ, ६ ब, ७ ब, ८ अ, ८ ब, ९ ब, १० अ, ११ अ, ११ ब, १२ अ, १३ ब, १४ अ, १५ ब, १६ अ, १६ ब, १७ अ, १८ ब, १९ ब, २० अ, २१ ब, २२ अ, २२ ब, २३ अ, २४ अ, २४ ब, २५ अ, २५ ब, २६ अ, २७ अ, २७ ब, २८ ब, २९ अ, ३० ब, ३१ अ


अनुसूचित जमाती


प्रभाग क्रमांक - २ अ


सर्वसाधारण आरक्षित प्रभाग


प्रभाग क्रमांक - १ क, २ क, ३ ब, ३ क, ४ क, ५ क, ६ क, ७ क, ८ क, ९ क, १० ब, १० क, ११ क, १२ ब, १२ क, १३ क, १४ क, १५ क, १६ क, १७ क, १८ क, १९ क, २० क, २१ क, २२ क, २३ क २४ क, २५ क, २६ क, २७ क, २८ क, २९ क, ३० क, ३१ ब

Comments
Add Comment