राजापुरात आज भाजपचा रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळावा

राजापूर (प्रतिनिधी ) : राजापूर तालुक्यात धोपेश्वर-बारसू, गोवळ परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला आता अंतिम स्वरूप आले आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून याबाबत आता सकारात्मक निर्णय होणार असून हा प्रकल्प राजापुरात उभारण्याबाबत हिरवा कंदील मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर राजापुरात भाजप राजापूर विधानसभा मतदारसंघाच्यावतीने आज रविवार २९ मे रोजी रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी भाजपाच्यावतीने करण्यात आली आहे.


आज सायंकाळी ४ वाजता राजापूर शहरातील गुजराळी येथील श्री मंगल कार्यालयात स्वागत मेळावा होणार असून भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे व भाजप प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार प्रमोद जठार यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


या रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्याच्या माध्यमातून रिफायनरी प्रकल्पाबाबत असलेले गैरसमज दूर करतानाच प्रकल्पाच्या माध्यमातून काय हवे आणि काय झाले पाहिजे याची चर्चा करून तशा मागण्यांचा अहवाल शिष्टमंडळ केंद्रीय उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेऊन त्यांना देणार आहे.


राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचे सर्वत्र स्वागत होत आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारला पत्र देऊन या प्रकल्पासाठी जागा देण्यात येणार असल्याचे कळविले आहे. तर सर्वच राजकीय पक्षांनी या प्रकल्पाचे स्वागत केले आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला असून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत हालचाली गतिमान झाल्याचे जठार यांनी सांगितले. केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष प्रकल्पस्थळावर पाहणी करून तांत्रिक बाबीही तपासल्या जात आहेत.


या रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्यात भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे व माजी आमदार प्रमोद जठार हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

Comments
Add Comment

संगमेश्वर तालुक्यात तीन जि. प. गटांत होणार हायहोल्टेज लढती

साडवली गटात माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची प्रतिष्ठा पणाला नीलेश जाधव देवरूख : जिल्हा परिषद व पंचायत

सीटीईटी परीक्षार्थी शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्याची मागणी

खेड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड यांच्यावतीने ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सीटीईटी परीक्षा

गुहागरात युती विरुद्ध उबाठा लढत रंगणार

आशिष कारेकर गुहागर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुहागर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद व १० पंचायत

अपघातात जखमींना मिळणार कॅशलेस उपचार

प्राण वाचवणाऱ्या मदतनीसालाही २५ हजार रुपये रोख बक्षीस रत्नागिरी : रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी

रत्नागिरी जिल्ह्यावर मळभ व पावसाचे सावट; आंबा-काजू उत्पादन धोक्यात

रत्नागिरी  : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट घोंगावत आहे. जिल्ह्यात पावसाचे

मंडणगडमध्ये दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढतीने वाढवली निवडणुकीची उत्कंठा

मंडणगड : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना ६-० असा