रिसॉर्टशी संबंध नाही, मग परब यांनी घरपट्टी, मालमत्ता कर का भरला?

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीच्या कारवाईनंतर आता आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. ईडीकडून कारवाई सुरु असलेल्या दापोलीतील रिसॉर्टशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा मंत्री परब यांनी केला आहे. परब यांच्या या दाव्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालमत्ता कराच्या पावत्या दाखवत मुख्यमंत्री ठाकरे आणि मंत्री परब यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्री अनिल परब दापोलीतील रिसॉर्ट माझ्या मालकीचे नसल्याचे सांगतात. दापोलीतील ते रिसॉर्ट सदानंद कदम यांचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. रिसॉर्ट दुसऱ्याच्या मालकीचे असताना डिसेंबर २०२० मध्ये परब यांनी या जागेचा मालमत्ता कर का भरला, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.


ते आज मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सोमय्या म्हणाले, माणूस एव्हढा नाटकी बनू शकतो, हे उद्धव ठाकरेंनी आपल्याला दाखवून दिले आहे. यांना नोबेल मिळाले पाहिजे. अनिल परब म्हणतात तो मी नव्हेच. त्या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही. १२ मुद्दे मी काढले आहेत. त्याची उत्तरे अनिल परब का देत नाहीत? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.


पुढे ते म्हणाले, अनिल परब यांनी २०२०-२१ मध्ये रिसॉर्टचा मालमत्ता कर भरला. त्याची पावती आहे. तो मी नव्हेच, नाट्यकार अनिल परबांनी याचे उत्तर द्यावे. दुसरी पावती आहे, ती नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ मधील. २०१९-२० मध्येही या रिसॉर्टचा मालमत्ता कर, दिवाबत्ती कर अनिल परब यांनी भरला आहे. हा रिसॉर्ट सदानंद परबचा आहे, तर अनिल परब घरपट्टी तुम्ही का भरत होतात?,' असा सवाल सोमय्यांनी केला.



मुख्यमंत्र्यांवर टीका करताना सोमय्यांची जीभ घसरली...


२५ कोटींचा रिसॉर्ट अनिल परब यांचा आहे, उद्धव ठाकरे यांनी १९ बंगल्यांचे नाटक केले, आता परब नाटक करत आहेत, यांना नोबेल मिळाले पाहिजे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने याआधी पहिला नाही. अनिल परब आता सुटणार नाहीत, त्यांना जेलमध्ये जावे लागणार आहे. हा पैसा वाझेचा आहे की खरमाटेचा आहे, हा सवाल आहे. आता यशवंत जाधव यांचीही सुरुवात झाली, काल प्रधान डीलर या विरोधात कंपनी मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे, त्यांच्या पूर्ण परिवार विरोधात कारवाई सुरू झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचा नंबर लागणार आहे, असेही त्यांनी सूचित केले आहे.

Comments
Add Comment

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. या

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, निलंबित PSI बदनेचा शोध सुरू

सातारा : सातारा जिल्हातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांना २४ तासांच्या आत आरोपी प्रशांत