यंदा आषाढी वारी होणार वारकऱ्यांच्या विक्रमी उपस्थितीत

पुणे (हिं.स.) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून आषाढी पायी वारी सोहळा काही मोजक्या वारकऱ्यांसमवेत लालपरीतून प्रवास करून पंढरीत साजरा करण्यात आला होता. मात्र सद्यस्थितीत राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने नियम, अटी व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे दोन वर्षांनंतर यंदा आषाढी पायी वारी सोहळा होणार आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून वारकरी वारीच्या तयारीला लागले आहे.


यंदा आषाढी वारी सोहळा हा वारकऱ्यांच्या विक्रमी उपस्थितीत साजरा होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पालखी सोहळ्यासोबत चालणाऱ्या भाविकांच्या संख्येत तब्बल ४० टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे यांनी वर्तविला आहे.


या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावरील मुक्काम, विश्रांती, भोजन, रिंगण सोहळे, नदी आणि इतर परंपरागत ठिकाणांची पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक, मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि इतर मानकऱ्यांनी पाहणी केली.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे