हापूसचा हंगाम पंधरा दिवसच

पुणे (हिं.स.) यंदा मान्सूनच्या आगमनामुळे कोकणातील हापूसचा हंगाम अंतिम टप्यात आहे. मे अखेरपर्यंत बाजारात आवक होईल, त्यानंतर आवक घटत जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात आणखी सुमारे पंधरा दिवस हापूसची चव चाखता येईल. सद्य:स्थितीत घाऊक आणि किरकोळ बाजारात हापूसचे दर आवाक्यात आहेत. किरकोळ बाजारात डझनाचा दर ३०० ते ६०० रुपये असा आहे.


तापमान, ढगाळ वातावरण, वादळ आणि अवकाळी पावसाच्या भितीने कोकणातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी हापूस बाजारात पाठवत आहेत. आवक वाढल्यामुळे हापूसच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत घट झाली आहे. घटलेले दर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणखी पंधरा दिवस कोकणातील हापूसची चव चाखता येईल. त्यानंतर मात्र गावरान हापूस बाजारात दाखल होण्यास सुरूवात होईल.


हवामान बदलामुळे यंदा हापूस आंब्यांच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. अवकाळी पाऊस, धुक्यामुळे आंबा लागवडीवर परिणाम झाला. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हापूसची बाजारात आवक सुरू झाली. त्यानंतर मार्च महिन्यात हापूसची आवक नियमित झाली. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात हापूसचे दर चढे होते. आवकही अपेक्षेएवढी नव्हती. यंदाच्या हंगामात आंब्यांची आवक टप्प्याटप्प्याने होत गेली. आवक नियमित होत नसल्याने आंब्याचे दर चढे होते.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना