औवेसींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यावरून महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावरून भाजपा-मनसेसह सत्ताधारी पक्षाकडूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिलेला असताना आता मोहित कंबोज यांनीही शिवसेनेला कोंडीत पकडत तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा, १५ मिनिटांत औवेसीला उत्तर देऊ, असे म्हटले आहे.


भाजपा नेते मोहित कंबोज म्हणाले की, औवेसी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात चिथावणीखोर भाषण करतो. शेरगील उस्मानी हिंदुंवर टीप्पणी करतो. त्यांच्यावर कारवाई होत नाही. परंतु हनुमान चालीसा लावू म्हणणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. राजद्रोहाची कलमे लावली जातात. १ हजार मस्जिदींवर भोंगे लावण्याची परवानगी दिली. वाह रे वाह ठाकरे सरकार, असा टोला त्यांनी लगावला आहे.


ठाकरे सरकार सत्तेसाठी लाचार झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एक कुत्रा येतो आणि औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेऊन हिंदुंना जाहिरपणे ललकारतो. त्यावर कसलीही कारवाई होत नाही, कसलाही गुन्हा दाखल होत नाही. एकीकडे हनुमान चालिसा पठण केले तर गुन्हे दाखल होतात. खुर्चीसाठी विचारधारा सोडली. बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले. आणि मुंबई शहरात सगळीकडे हिंदुत्वाची बॅनरबाजी कसली करता? तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा १५ मिनिटांत ओवैसीला उत्तर देऊ, असा इशारा मोहित कंबोज यांनी दिला आहे.


तुझे थगडेही तिथेच बांधणार – मनसे

अकबरुद्दीन औवेसी यांनी औंरगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यानंतर मनसेनेही आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. एक दिवस त्या औरंगजेबच्या थडग्या शेजारीच तुझे थडगे आम्ही बांधल्याशिवाय शांत बसणार नाही. हा हैदराबादचा कुत्रा आहे, त्याच्या अंगात पाकिस्तान्याचे रक्त आहे, अशा शब्दात मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.


महाराष्ट्राला अशांत करण्याचे राजकारण - शिवसेना

"संभाजीनगरला वारंवार यायचे आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे हे महाराष्ट्राला अशांत करण्याचे राजकारण ओवेसी बंधू करत आहेत. महाराष्ट्रावर चाल करणारा २५ वर्ष रडत राहीला. त्याला कधीच यश मिळाले नाही. औरंगजेब काही साधू संत नव्हता. इतिहास तुम्हाला सगळे सांगेल. औरंगजेबाच्या कबरीवर वाकून महाराष्ट्राला आव्हान देण्याची गोष्ट तुम्ही करत असाल तर ते आव्हान आम्ही स्वीकारले आहे. जे औरंगजेबाचे झाले तेच त्याच्या भक्तांचेही होईल, औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणा-याला तिथेच गाडू" असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

Comments
Add Comment

पुण्यात पसरला विषारी धूर, ५ विद्यार्थी रुग्णालयात; २० हजार विद्यार्थ्यांच्या कॉलेजला सुट्टी, एक कंपनी बंद

पुणे : पुण्यात लोणी काळभोर परिसरात मुळा-मुठा नदीपात्रात निमयित मोठ्या प्रमाणात कचरा टाकून तो जाळला जात आहे. या

Nagpur Blast : नागपूर कारखाना स्फोट; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

नागपूर येथील कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला, आणि

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.

Pune: धक्कादायक! पुण्यात महिलेची गर्भाशयाची गाठ काढण्याऐवजी डॉक्टरांनी...

पुणे: पुण्यातील मांजरी परिसरातील एका खासगी रुग्णालयातून वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

Nagpur Blast : काटोलमध्ये स्फोटक कारखान्यात भीषण दुर्घटना; १२ ठार, १५ जखमी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत १ मार्च रविवारी सकाळी सुमारे ७

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या