गोंदिया (हिं.स.) : कपडे वाळत घालताना लोखंडी सळीचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे विद्युत धक्का बसून एका महिलेचा आणि बैलाचा मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यामधील पानगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली. प्रेमकला जितेंद्र पटले असे या महिलेचे नाव आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार प्रेमकला नेहमी प्रमाणे कामे आटोपून बाजूच्या अंगणात असलेल्या लोखंडी तारेवर कपडे वाळविण्यासाठी गेल्या असता या तारेला विद्युत करंट असल्याने त्यांचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला. आजूबाजूच्या लोकांनी लाकडी काठीने विद्युत तारेला बाजूने करण्याचा प्रयत्न केला असता दरम्यान विद्युत प्रवाही तार जवळच असलेल्या बैलाच्या अंगावर पडल्याने बैलाचाही घटनास्थळी मृत्यू झाला.
घटनेची माहिती आमगाव पोलिसांना देण्यात आली असून महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृतक महिलेचा पती हा कामानिमित्त दुसऱ्या राज्यात गेला असून त्यांना दोन मुले आहेत.
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून (Marathi) दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रकाश…
मुंबई : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० लाख…
मुंबई : प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजनासाठी चटपटीत मसालेदार कंटेन्ट हवा असतो. या स्पर्धेत मराठी चित्रपटांनी सगळ्याच…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ जणांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन…
महिलांना किंवा मुलींना ब्लाऊजचे नवीन नवीन पॅटर्न शिवण्याची खूप आवड असते. कोणत्याही समारंभात साडी नवीन…