आरोग्य भरती पेपरफुटीमध्ये न्यासाचा हात

पुणे : आरोग्य भरती पेपरफुटीसाठी न्यासा ही जबाबदार असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी म्हटले आहे. पुणे पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणाबाबत आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या पेपरफुटी प्रकरणात सामिल असलेल्या न्यासाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


म्हाडा भरती परीक्षेआधी एका टोळीचा पर्दापाश करण्यात आला होता. या भरती परीक्षेचा पेपर फुटण्याआधीच कारवाई करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात आल्यानंतर आणखी काही जणांना अटक करण्यात आली होती. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज या प्रकरणाबाबत आणखी माहिती दिली.


२४ ऑक्टोबर रोजी झालेला आरोग्य विभागाचा गट क चा पेपरही फुटला होता. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी सहभागी होते  अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली. गट 'ड' चा पेपर न्यासाचे अधिकारी आणि बोटले आणि बडगिरे अशा दोन व्यक्तींच्या माध्यमातून फुटला. दोघे एकमेकांशी संबंधित होते का याचा तपास सुरू आहे. गट 'क' चा पेपर फोडण्यात न्यासाच्या अधिकाऱ्यांसोबत  सहभागी असलेल्या दोन दलालांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.


एका पेपरसाठी हे दलाल पाच ते आठ लाख रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे.  न्यासा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी देखील यात सहभागी आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.  न्यासाच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका प्रिंट करताना पेपर फोडला असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.

Comments
Add Comment

तोच फोटो ठरला शेवटची आठवण, एकाचवेळी झाला सात मित्रांचा मृत्यू

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अस्तंबा अर्थात अश्वस्थामा यात्रेतून परतणाऱ्या यात्रेकरूंना

मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम झाल्याचा पुरावा आहे का ?

मुंबई : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आरक्षण दिले

यंदाच्या दिवाळीत प्रदूषण नियंत्रण मंडळ १५८ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मोजणार

मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरण

जातीयवादामुळे विद्यार्थ्याच्या नोकरीवर गदा?

महाविद्यालयावर आरोप; वंचित आघाडीचे आंदोलन पुणे  : पदवीधर झालेल्या प्रेम बिऱ्हाडे या दलित तरुणाला लंडनच्या

ऐन दिवाळीत 'काळाचा घाला'! नाशिकजवळ कर्मभूमी एक्स्प्रेसमधून पडून २ युवकांचा दुर्दैवी अंत, १ गंभीर

नाशिक: मुंबईत पोटापाण्यासाठी गेलेल्या आणि दिवाळीच्या सणासाठी आपल्या कुटुंबीयांना भेटायला बिहारच्या दिशेने

प्रेम बिर्‍हाडेचा 'नोकरी'चा दावा खोटा? कॉलेजने उघड केले धक्कादायक सत्य!

पुणे: लंडनमध्ये आपली नोकरी गमावल्याचा भावनिक दावा करत समाजमाध्यमांवर प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या प्रेम