मालवण समुद्र किनारा पर्यटकांनी गजबजला

सिंधुदुर्ग : ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत असा दुहेरी योग साधण्यासाठी मालवणात राज्यभरातले अनेक पर्यटक दाखल झाले आहेत. येणाऱ्या पर्यटकांच्या पाहुणचारासाठी पर्यटन व्यावसायिक सुद्धा सज्ज झाले आहेत.


गेले दोन तीन दिवस मालवण, तारकर्ली, देवबाग, दांडी किनारपट्टी ते बंदर जेटी परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत, हॉटेल्स लॉजिंग, रिसॉर्ट बऱ्यापैकी फुल झाले आहेत, कोरोना महामारीच्या संकटामुळे गेली दीड वर्ष पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता मात्र आता हा व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर आला आहे. ख्रिसमसची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने पर्यटक मालवण भागात दाखल झाले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसापासून मालवण येथील शिवरायांच्या किल्ले सिंधुदुर्ग वर मालवण बंदर जेटी चीवला बीच तारकर्ली देवबाग दांडी या किनारपट्टी परिसरावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणची हॉटेल, लॉजिंग, खाजगी सरकारी रिसॉर्ट सुद्धा गजबजून गेली आहेत.

राज्यात नव्याने शिरकाव केलेल्या ओमीक्रोन विषाणूच्या धोक्यामुळे मालवणातील पर्यटन व्यावसायिकांनी खबरदारी घेतली असून कोरोनाचे अटी शर्तीं आणि नियम लक्षात घेऊन पर्यटकांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Comments
Add Comment

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर

हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे

उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी; शाळा बंद आंदोलनाला मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा जाहीर पाठिंबा

मुंबई: राज्यातील शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय

Vasantdada Sugar Institute : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला वेग; १७ वर्षांचा आर्थिक लेखाजोखा मागवला

मुंबई : शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी सुरू

महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू?

राज्य निवडणूक आयोगाची आज आयुक्तांसोबत बैठक २७ महानगरांचे सोपे गणित, ५०% आरक्षणात जिल्हा परिषदा