दुचाकी नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

पनवेल : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल कार्यालयामध्ये दुचाकी मोटार वाहनांच्या नवीन नोंदणीसाठी MH46 CD ही नवीन मालिका लवकरच सुरु होत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल यांनी कळविले आहे.


पनवेल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील उरण, पनवेल, कर्जत व खालापूर तालुक्यातील नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, ज्यांना आपल्या नवीन वाहनासाठी MH46 CD या मालिकेतील महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 57अ अन्वये आकर्षक/अनाकर्षक नोंदणी क्रमांक राखीव करावयाचे असतील त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत संपर्क साधण्यात यावा. असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे यांनी केले आहे.


एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केल्यास तरतूदीनुसार नोंदणी क्रमांकासाठी जाहीर लिलाव केला जाईल याची नोंद घेण्यात यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Comments
Add Comment

शॉर्ट सर्किटमुळे ‘समृद्धी’वर खासगी बसला अपघात

३६ प्रवासी सुखरूप, मोठा अनर्थ टळला मलकापूर (प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर

राजमाता जिजाऊ बदनामी प्रकरणात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २२ वर्षांनंतर मागितली माफी

पुणे : जेम्स लेनच्या 'शिवाजी-हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकावरून दोन दशकांपूर्वी

पुणे : कोथरुडमध्ये उबाठा उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरुड विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग

पुण्यात हायव्होल्टेज सामना; आंदेकर कुटुंबाकडे किती मालमत्ता? प्रतिज्ञापत्रातून खुलासा

आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभाग क्रमांक २३ मध्ये जोरदार सामना पहायला मिळणार

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी बसला भीषण आग

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांचे आणि आगीच्या घटनांचे सत्र थांबता थांबत नाहीये. आज पुन्हा एकदा

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; पुण्यात पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे ४० जण जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हैदोस माजवत अनेक जणांना चावा घेतला आहे. या