भंडारा : दोन चिमुकल्यांसह मातेचे विषप्राशन, मुलगा दगावला

भंडारा- भंडारा जिल्ह्याच्या ठाणा गावात एका ३५ वर्षीय आईनेच आपल्या पोटच्या मुला मुलींसह स्वतः विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात १४ महिन्याच्या कार्तिक शहारे या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर ५ वर्षीय विधी आणि ३५ वर्षीय वंदना यांच्यावर नागपुरातील वैद्यकीय महाविद्ययात उपचार सुरु आहेत.

ठाणा गावातील ज्ञानेश्वर शहारे आणि त्यांची पत्नी वंदना शहारे हे १३ डिसेंबरला संध्याकाळी बाजारातून घरी परत आले. कुटूंबियांनी रात्री जेवण केल्यावर वंदना डोके दुखत असल्याचे कारण सांगत घराशेजारी असलेल्या मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी गेली आणि मेडिकलमधून तांदळामध्ये टाकण्याचे औषध घेऊन आली. वंदनाने आपल्या १४ महिन्यांच्या मुलाला आणि ५ वर्षाच्या मुलीला हे औषध पाजले आणि स्वतःही प्राशन करीत झोपण्यासाठी गेली असता मध्यरात्री अचानक मुलामुलींना उलट्या आणि मळमळ होत असल्याने हा प्रकार उघडकीस आला.


तिघांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दखल करण्यात आले होते. १४ महिन्याचा कार्तिक याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर ५ वर्षीय मुलगी आणि ३५ वर्षीय वंदना हिला पुढील उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात आले आहे. दोघांवर उपचार सुरु आहेत. मात्र वंदनाने मुलांसह आत्महत्येचे पाऊल का उचलले हे मात्र कळू शकले नसून जवाहर नगर पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे