मुंबई (प्रतिनिधी) : बांगलादेशप्रमाणे मुंबईतही हिंदू असुरक्षित आहेत. त्यामुळे मालवणी भागातसुद्धा भीतीचे वातावरण आहे. आम्ही अशा ठिकाणांना भेटी देऊन हिंदूंना हिम्मत देणार आहोत, असे आमदार नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे म्हणाले की, बांगलादेशप्रमाणे मुंबईत मालवणी भागातसुद्धा भीतीचे वातावरण आहे. मुंबईतील अनेक भागातही अशीच परिस्थिती आहे. आम्ही अशा ठिकाणांना भेटी देऊन हिंदूंना हिम्मत देणार आहोत. मुख्यमंत्री बंगाल पॅटर्न मुंबईमध्ये कसे राबवत आहेत? त्याचा पर्दाफाश येणाऱ्या दिवसात आम्ही करणार आहोत, असे नितेश राणे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अल्पसंख्याक हिंदूंच्या घरांवर हल्ले होत आहेत. हिंदूंची घरे जाळली आहेत. त्यामुळे तेथे अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये भितीचे वातावरण आहे.