इंधनानंतर भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला

  369

विजय मांडे


कर्जत : इंधनाच्या दरांनी शंभरी पार केली आहे. त्यातच भर म्हणून सर्वसामान्य तथा श्रीमंतांना लागणारी रोजची आवश्यक गोष्ट म्हणजे भाजीपाला. या भाजीपाल्याचे भावही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा हताश सवाल सर्वसामान्य विचारत आहेत.


कोरोना महामारीमुळे दीड ते दोन वर्षे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली तर, अनेकांचे व्यवसाय-धंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केली असून घरगुती गॅस हजारी गाठण्याच्या स्थितीत आहे. इंधनाच्या भाववाढीचा भडका उडाला आहे. त्यातच आता रोजच्या जीवनात लागणाऱ्या भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले असून या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिक बेजार झाला आहे.


भाजीपाल्याचे दर वाढल्याने मटार- २०० रुपये किलो, फ्लॉवर - ८० रुपये किलो, कोबी - ४० रुपये किलो, टमाटर - ६० रुपये किलो, घेवडा - ७० रुपये किलो, काकडी - ५० रुपये किलो, गवार - ८० रुपये किलो, मिरची - ६० रुपये किलो, वांगी - ८० रुपये किलो, भेंडी - ६० रुपये किलो, फरसबी - ६० रुपये किलो, लालभोपळा - ५० रुपये किलो, तोतापुरी आंबा - १५० रुपये किलो, राजमा - १२० रुपये किलो, तोंडली - ६० रुपये किलो, सुरण - ६० रुपये किलो, काकडी - ४० रुपये किलो, बिट - ४० रुपये किलो, गाजर - ६० रुपये किलो, सिमला मिरची - ७० रुपये किलो, शेवगा शेंगा - १२० रुपये किलो, आले - ६० रुपये किलो, कांदा - ५० रुपये किलो, बटाटा - २० रुपये किलो, मशरुम - २०० रुपये किलो, तर पालेभाजींमध्ये मेथी - ३० रुपये जुडी, कांद्याची पात - ३० रुपये, शेपू - २० रुपये, मुळा - २० रुपये, कोथिंबीर - ६० रुपये जुडी झाली आहे.



भाव का वाढले?


या भाववाढीबद्दल अनेक वर्षांपासून कर्जत बाजारपेठेत भाजी विक्री करणारे शिवनारायण लोदी यांनी सांगितले की, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. होलसेल बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाली त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत.


भाजीपाला ही रोज लागणारी वस्तू आहे. भाजीपाल्याचे भाव वाढले तरी खरेदी करावीच लागते. मात्र सर्वसामान्यांचे कंबरडे भाववाढीमुळे मोडले आहे. - सुनिल ठोंबरे, ग्राहक

Comments
Add Comment

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

खेड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग, प्रवासी थोडक्यात बचावले

खेड मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ रविवारी (दि. २४) पहाटे २.१० वाजता लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना