Saturday, December 14, 2024
Homeताज्या घडामोडी६ मुलांवर लसीकरण ट्रायल यशस्वी

६ मुलांवर लसीकरण ट्रायल यशस्वी

नायर रुग्णालयात ८ ऑक्टोबरपासून सुरू होती चाचणी

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात सहा मुलांवर कोरोना प्रतिबंधित लसीची ट्रायल यशस्वी झाली आहे. नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर लसीकरणाची ट्रायल ८ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून यात सहा मुलांची यशस्वी ट्रायल करण्यात आली आहे.

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. यामध्ये १४ नोव्हेंबरपर्यंत १८ वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांना एकूण १,३३,५९,६७८ डोस देण्यात आले आहेत. यामध्ये ८५,७८,६८५ जणांनी पहिला डोस तर ४७,८०,९९३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. यासोबतच आता लहान मुलांच्या लसीकरणाला देखील लवकरच सुरुवात होणार आहे.

यामुळे नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणाची ट्रायल सुरू करण्यात आली आहे. यासाठी २,३०,२७,२०५ आणि २,३०,२७,२०४ असे दोन दूरध्वनी क्रमांक नोंदणीसाठी देण्यात आले आहेत. पालिकेला मिळालेल्या नव्या गाईड लाईननुसार आता २ ते १८ वर्षे वयोगटासाठी तीन गट करण्यात आले आहेत.

यामध्ये २ ते ७ वर्षे, ८ ते ११ आणि १२ ते १८ वर्षे असे वयोगट तयार करण्यात येणार आहेत. महापालिकेने नुकत्याच केलेल्या सेरो सर्वेक्षणानुसार ५० टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झालेले असल्याने तसेच अँटीबॉडीज आढळलेल्या मुलांमध्ये गाईड लाईनप्रमाणे ट्रायल घेता येणार नाही. त्यामुळे ट्रायलसाठी प्रतिसाद वाढण्याची गरज असल्याचे डॉ. भारमल यांनी सांगितले.

तर सध्या मुलांच्या लसीकरणाच्या ट्रायलसाठी नोंदणी सुरूच असून पालक-मुलांनी यासाठी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पालिकेचे वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय संचालक आणि नायरचे अधीक्षक डॉ.रमेश भारमल यांनी स्पष्ट केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -