मुरबाड (वार्ताहर) : मुरबाड पोलीस ठाणे व टोकावडे पोलीस ठाणे हद्दीतील ३८३ दुर्गामातेच्या मूर्तींचे शुक्रवारी सायंकाळी नदी, तलाव तसेच मुरबाड परिसरातील कृत्रिम तलावांमध्ये भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. तसेच ५३४ घटस्थापना करण्यात आलेले घट दसऱ्याच्या एक दिवस अगोदर उठवण्यात आले. नवरात्रोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, भजन स्पर्धा, कीर्तन सोहळा तसेच प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते. मुरबाडमध्ये सर्वच दुर्गामाता भक्त तसेच घटस्थापना भक्तांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून यावर्षी नवरात्र उत्सव अगदी साधेपणाने साजरा केला.
३८३ दुर्गामातांच्या मूर्तींचे मुरबाडमध्ये विसर्जन
