पुणे-मुंबई प्रवासात ई-बसची भर

मुंबई (प्रतिनिधी): इव्हे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड लेक्ट्रिक बस ऑपरेटर कंपनीने (एमईआय समूह कंपनी) बुधवारपासून पुणे ते मुंबई दरम्यान "पुरीबस" नावाने आंतर-शहर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे.


विजयादशमीच्या (दसरा) शुभमुहुर्तापासून या इलेक्ट्रिक बसच्या नियमित प्रवासफेऱ्यांना सुरुवात झाली आहे. ही इलेक्ट्रिक बस पूर्ण चार्ज केल्यानंतर ३५० किमीपर्यंत अंतर सहज कापू शकते, असा कंपनीचा दावा आहे. प्रत्येक सीट जवळ चार्जर, आरामदायक पुश बॅक सीट, वाय-फायसह मनोरंजनासाठी बसमध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि सेफ्टीसाठीही अनेक लेटेस्ट फीचर्स या इलेक्ट्रिक बसमध्ये कंपनीने दिले आहेत.


इव्हे ट्रान्सद्वारे सुरु होणाऱ्या या आंतर-शहर सेवेमुळे, लांब पल्ल्याचा प्रवासही किफायतशीर, शून्य-उत्सर्जन, ध्वनीप्रदुषणाविना आणि आरामदायक प्रवास होईल असा कंपनीचा दावा आहे. शून्य-उत्सर्जन, इलेक्ट्रिक इंटरसिटी कोच बसमध्ये चालक आणि सहचालक सोडून ४५ प्रवासी बसू शकतात. मन प्रसन्न करणाऱ्या आकर्षक रंगसंगतीने बसची सजावट करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार केलेल्या या एसी ई-बसमध्ये आरामदायक पुश बॅक सीट आहेत. वाय-फायसह मनोरंजनासाठी बसमध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे.


इव्हे ट्रान्सच्या इलेक्ट्रिक बसमध्ये सुरक्षेचीही चांगली काळजी घेण्यात आली आहे. यात अनेक सुरक्षा प्रणाली आहेत, ज्यामध्ये टीव्हीयु प्रमाणित इयू मानांकित एफडीएसएस प्रणाली, भारतीय मानकानुसार बनवलेली एडीएएस प्रणाली (प्रगत चालक सहाय्य प्रणाली) आणि आयटीएस प्रणाली समाविष्ट आहे. बसमध्ये संकट समयी उपयोगात येणारे पॅनिक अलार्म सिस्टिम आणि इमर्जन्सी लाईट इत्यादींची व्यवस्थाही करण्यात आली आहे. याशिवाय बसमध्ये बसवलेले डी-फ्रॉस्टर धुक्यात वाहन चालवताना चालकाची व्हिजिबिलिटी सुधारण्यास मदत करतात.


Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या