Saturday, December 14, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरडहाणूत मध्यरात्री तीन दुकानांना आग

डहाणूत मध्यरात्री तीन दुकानांना आग

डहाणू (वार्ताहर) : डहाणू रोड येथील वनपरिक्षेत्र कार्यालयासमोरील जनक स्टोअरमधील पोपटकाका यांचे आयुर्वेदिक औषधाचे दुकान, इंटवाला टेलर यांचे कपड्याचे दुकान आणि श्यामलाल पंजवानी यांच्या दुकानाला गुरुवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमुळे करोडोंचे नुकसान झाले असून इमारतीचा तळमजला आणि पहिला मजला आगीत जळून खाक झाला आहे. सुदैवाने, या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती डहाणू पोलिसांनी दिली.

शुक्रवार दि. १५ च्या दसऱ्याच्या मुहूर्ताची सुरुवात या घटनेने झाली. रात्री १ वाजण्याच्या सुमारास आग शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी डहाणू नगर परिषद, अदानी विद्युत केंद्र, पालघर नगर परिषद, तारापूर औद्योगिक वसाहत आणि लगतच्या गुजरात राज्यातील उंबरगाव येथील अग्निशामक दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. त्यांनी आग पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास नियंत्रणात आणली.

आग का भडकली?

डहाणू रोड येथील जनक स्टोअरमधील पोपटकाकांच्या देशी आयुर्वेदिक औषधाचे व पूजेचे सामान असलेले दुकान असून त्यात दसरा सणासाठी खूप सामान भरलेले होते. त्यांतील तूप, हवन सामग्रीने पेट घेतला, तर फटाक्यांमुळे छोट्या-मोठ्या स्फोटाने नागरिक हादरले. हे दुकान अंत्यसंस्कारांचे सामान विकणारे डहाणूतील एकमेव दुकान होते. आगीने लगतच्या प्रकाश जीवनजी इंटवाला यांच्या इंटवाला गारमेंट कपड्याच्या दुकानातील कपड्याचे तागे, साड्या, रेडीमेड ड्रेस, तसेच ब्लँकेटला आग लागल्याने ती अधिकच भडकली. शिवाय, लगतच्या सिमेंट व पत्रे असलेले हितेश पंजवाणी यांच्या दुकानाचेही नुकसान झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -