Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीमराठा आरक्षण मिळेपर्यंत हार घालणार नाही : पंकजा मुंडे

मराठा आरक्षण मिळेपर्यंत हार घालणार नाही : पंकजा मुंडे

पंकजा मुंडेंची राज्य सरकारवर टीका

बीड (प्रतिनिधी): मराठा आरक्षण मिळेपर्यंत गळ्यात हार घालणार नाही असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दसऱ्यानिमित्त भगवान गडावर आयोजित मेळाव्यात शुक्रवारी जाहीर केले. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण सर्वांसाठी मी आवाज उठवणार आहे असं जाहीर करताना पंकजा मुंडे यांनी मराठा समाज-ओबीसी समाजात भांडण लावल्याचं कटकारस्थान रचलं जात आहे असा आरोप केला. दोन्ही मिळूनच बहुजन समाज आहे सांगताना त्यांनी एकत्र आणून वज्रमूट करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितले. याआधी ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत फेटा नेसणार नसल्याचे पंकजा यांनी जाहीर केलं होतं.

राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांवर अत्याचर, बलात्कार होत आहेत…. महिलांकडे वाकडी नजर करुन जरी पाहिलं तर डोळे काढून घेणाऱ्याची ही भूमी आहे. हत्तीच्या पायाखाली दिलं पाहिजे. राज्यात काय चाललंय काय? त्यावर बोलायचं नाही…आरोपींवर बोलायचं नाही. सरकार जर असं काम करत असेल तर जाब विचारायचा की नाही?,” अशी विचारणा पंकजा मुंडेंनी केली.

सरकारने नुसतं पॅकेज जाहीर करुन चालणार नाही, प्रत्येकाच्या हातात मदत द्यावी आणि दिवाळी गोड करावी. फक्त मोदींचे तेवढे पैसे येत आहेत. पण राज्य सरकारचे, पालकमंत्र्यांचे आले का? पण असं काही बोललं की यांना राग येतो. आता तुम्ही सत्तेत आहात तर तुम्हाला विचारणार ना…तुम्ही विरोधात होता तेव्हा तर धमक्या देत होतात,” अशी टीका पंकजा मुंडेंनी केली. “आता काय बीड जिल्ह्याची आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था आहे. एक रुपया तरी आहे का? माझ्याच योजना चालू आहे. आपलं मंत्रीपद भाड्याने देऊन टाकलं आहे यांनी. यांचं काहीच चालत नाही. आमचं म्हणणं आहे तुम्ही जनतेच्या हिताचं काम करा आम्ही जाहीर अभिनंदन करु,” असं म्हणत पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

‘पंकजाताई घरात बसल्या आहेत म्हणून खूश झालेल्यांनी माझा दौरा लिहून घ्या. मी दिल्ली, नवी मुंबई, नाशिकचा दौरा करणार आहे. तसेच ऊसाच्या फडात जाऊन संवाद साधणार आहे,’ असे मुंडे यांनी सांगितले. तसेच दौऱ्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, महिलांची सुरक्षा, शेतकऱ्यांना मिळणारी अतिवृष्टी मदत, ऊसतोड कामगार आणि शेतमजूर हे विषय मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर

राज्यात महिलांवर अत्याचार, बलात्कार होत असल्यामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांकडे वाकडी नजर करून जरी पाहिले तर डोळे काढून घेणाऱ्याची ही भूमिका आहे. अशांना हत्तीच्या पायाखाली दिले पाहिजे. राज्यात काय चालले आहे? त्यावर बोलायचे नाही…आरोपींवर बोलायचे नाही. जर सरकार असे काम करत असेल तर जाब विचारायचा की नाही? अशी विचारसरणी पंकजा मुंडे यांनी केली.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फक्त मोदींचे हात पुढे सरसावत आहेत. परंतु, राज्य सरकार आणि पालकमंत्र्यांचे काय? असे काही बोलले तर त्यांना राग येतो. विरोधात असताना तुमच्या धमक्या येत होत्या तर आता सत्तेत आहात तर तुम्हाला विचारणार ना…अशी टीका मुंडे यांनी केली. तसेच पूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करून नाही तर, पूरग्रस्तांच्या हातात मदत देऊन त्यांची दिवाळी गोड करावी असे त्या म्हणाल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -