Friday, April 26, 2024
Homeदेशतिस्ता सेटलवाड, अहमद पटेलांनी रचला होता मोदींना अडकवण्याचा कट

तिस्ता सेटलवाड, अहमद पटेलांनी रचला होता मोदींना अडकवण्याचा कट

एसआयटी चौकशी समितीचा दावा

अहमदाबाद : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्यासह इतरांनी गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अडकवण्याचा कट रचला होता, अशी माहिती विशेष तपास पथकाने सेशन्स कोर्टाला सांगितले. मोदींचे गुजरातमधील सरकार काहीही करुन पाडायचे, यासाठी हे कारस्थान रचल्याचेही एसआयटीने म्हटले आहे.

एसआयटीने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले यावेळी त्यांनी आरोपींच्या जामिनाला विरोध केला. जामिनाला विरोध करताना एसआयटी अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितले की, गुजरातची प्रतिमा खराब करण्यासाठी कट रचला गेला होता. यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा सहभाग होता. ते तेव्हा राज्यसभा खासदार आणि काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते.

एसआयटीच्या चौकशी समितीने दावा केला आहे की, गुजरातमधील निवडून आलेले सरकार पाडणे हे सेटलवाड यांचे राजकीय ध्येय होते. विरोधी पक्षाकडून त्यांना यासाठी अवैध मार्गाने ३० लाख रुपये मिळाले होते. विरोधी पक्षाकडून सेटलवाड यांना गुजरातमधील विविध अधिकारी आणि निरपराध लोकांना विविध प्रकरणांमध्ये अडकवणे आणि त्यांच्यावर खटले चालवण्याचे त्या काम करत होत्या. यामध्ये नरेंद्र मोदी देखील त्यांच्या टार्गेटवर होते. याप्रकरणी तिस्ता सेटलवाड, माजी आयपीएस अधिकारी आरबी श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांना अटकही करण्यात आली होती.

दरम्यान, अशा प्रकारे एसआयटी काही लोकांच्या सांगण्यावरुन काम करत आहे. तसेच जे लोक सध्या हयात नाहीत त्यांच्यावर आरोप करुन त्यांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -