Friday, April 26, 2024
Homeताज्या घडामोडीराऊत थोडक्यात वाचले -छगन भुजबळ

राऊत थोडक्यात वाचले -छगन भुजबळ

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडली. महाराष्ट्रातील राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होती. या जागेवर भाजपचे धनजंय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार उमेदवार होते. धनंजय महाडिकांनी हा विजय खेचून आणला. राज्यसभा निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही राज्यसभा निकालावर खोचक मत व्यक्त केले. संजय राऊत थोडक्यात वाचले नाहीतर उलटे झाले असते, संजय पवार निवडून आले असते आणि राऊत मागे राहिले असते, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले.

संजय राऊत यांनी आता अपक्षांची नाव घेऊन त्यांना आणखी दुखवण्यापेक्षा लोकांना जवळ करा, असा सल्लाही छगन भुजबळ यांनी दिला आहे. भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून यावेत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण दुर्दैवाने चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला. पण महाविकास आघाडीला हा मोठ्ठा धक्का आहे असे नाही, आमच्याकडे १६६ पेक्षा जास्त आमदार होते. आम्ही नियोजनात चुकलो, अशी कबुली भुजबळ यांनी दिली.

भाजपने दोन उमेदवारांना ४८/४८ मते दिली, पहिल्या फेरीनंतर ज्याला जास्त मते आहेत, त्याची मत इतरांना ट्रासन्फर होतात. भाजपची मते ट्रान्स्फर झाली, आमची मते ट्रान्स्फर होण्याचा योगच आला नाही. संजय राऊत यांनाच अडचण निर्माण होते का?अशी परिस्थिती निर्माण झाली होती. महत्वाच्या नेत्यांना आधी सेफ करायला पाहिजे होते. आम्ही १७० पेक्षा १८० मंतांची व्यवस्था करायला पाहिजे होते, यात कमी पडलो, असे भुजबळ म्हणाले.

पवार साहेबांचे मार्मिक स्टेटमेंट आले आहे, देवेंद्र फडणवीस अधिक लोकांना जवळ करण्यात यशस्वी ठरले. याचा दुसरा अर्थ आम्ही तिन्ही पक्षाच्या लोकांनी समजून घेतला पाहिजे. अधिक लोक जवळ केली पाहिजेत. तिन्ही पक्षाच्या आमदारांची नाराजी मोठ्या प्रमाणात उफाळून आली होती. नाराजी निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. महाविकास आघाडीचा आमदार आपल्याच पक्षाचा असतो, असे समजून काम करायला पाहिजे. आमदार दुखावला जाणार नाही, त्यांच्या कामात अडथळा निर्माण होणार नाही, याची शिकवण आम्हाला मिळाली आहे, अशी कबुलीही भुजबळ यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -