मुंबई: भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या मुंबईसाठी डोमेस्टिक क्रिकेट खेळत आहे. सूर्या नुकत्याच संपलेल्या सय्यद मुश्ताक ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसला होता. आता तो विजय हजारे ट्रॉफी खेळताना दिसणार आहे. आज २१ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यातच सूर्याचा नवा लूक समोर आला आहे.
सूर्याच्या या नव्या लूकची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे. त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या नव्या लूकचे फोटो शेअर केलेत. या लूकमध्ये सूर्या एका नव्या हेअरस्टाईलमध्ये दिसत आहे. आपल्या या लूकमध्ये सूर्याने क्लीन शेव केले आहे.
View this post on Instagram
सूर्या टीम इंडियाचा टी-२० कर्णधार बनला आहे. रोहित शर्माने २०२४मध्ये टी-२० वर्ल्डकपनंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सूर्याला टी-२०चा कर्णधार बनवण्यात आले.
आतापर्यंत सूर्याने कर्णधार म्हणून टीम इंडियासाठी १७ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत या दरम्यान त्याने ५३० धावा केल्या.