रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर या गोष्टी खा

कमकुवत रोगप्रतिकारशक्तीमुळे वारंवार सर्दी-खोकला, थकवा जाणवतो

आहारात योग्य पदार्थांचा समावेश केला तर शरीर नैसर्गिकरित्या मजबूत होते

व्हिटॅमिन Cयुक्त फळे :  संत्री, आवळा, लिंबू, पेरू यामध्ये भरपूर व्हिटॅमिन C असते

हे पांढऱ्या रक्तपेशींची ताकद वाढवते आणि संसर्गापासून संरक्षण करते

हिरव्या पालेभाज्या :  शरीरातील पेशी निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर

सुका मेवा :  दररोज मूठभर सुका मेवा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो

लसूण आणि आलं :  सर्दी-खोकल्यापासून बचावासाठी रोजच्या जेवणात वापरा

दही आणि प्रोबायोटिक्स :  पचन चांगले असेल तर रोगप्रतिकारशक्तीही सुधारते

दूध हळद :  झोपण्यापूर्वी हळद दूध पिणे फायदेशीर ठरते

योग्य आहारासोबत पुरेशी झोप, व्यायाम आणि पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे