Friday, April 26, 2024
Homeताज्या घडामोडीअनधिकृत डेब्रिज माफिया विरोधात सिडकोची कारवाई!

अनधिकृत डेब्रिज माफिया विरोधात सिडकोची कारवाई!

नवी मुंबई बाहेरील डेब्रिज नवी मुंबईत?

नवी मुंबई(प्रतिनिधी ) – नवी मुंबई बाहेरून.डेब्रिज माफिया कडून मोठया प्रमाणावर नवी मुंबईतील सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृत डेब्रिज टाकले जात आहे. सिडकोच्या डेब्रिज विरोधी कारवाई पथकाने गेल्या आठवड्यात जवळपास १०० पेक्षा जास्त डेब्रिज टाकणाऱ्या डंपर व त्यावरील चालक यांच्या विरोधात कारवाई केली आहे.

सिडको महामंडळाने संपादित केलेल्या जमीनीवर तसेच संपादित करण्यात येत असलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणाऱ्यांविरुध्द केलेल्या कारवाई बाबत सिडको महामंडळाने संपादित केलेल्या तसेच संपादित करण्यात येत असलेल्या जमीनीवर , भूखंडावर मोठया प्रमाणात अनधिकृतपणे डंपर वाहन चालकांकडून डेब्रीज टाकण्यात येत असून सदरचे डेब्रीज हे मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानीकारक असल्याचे निदर्शनास आले आहे.

अनधिकृत डेब्रिजला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य दक्षता अधिकारी, सिडको यांच्या नेतृत्वाखाली दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रिकी विभाग व नवी मुंबई वाहतुक पोलीस विभाग यांचेसह सिडको कार्यक्षेत्रात मोहिम राबवत असताना . ५एप्रिल २०२४ रोजी दुपारी १३:०० वाजताचे सुमारास वाशी ओव्हर ब्रिज जवळ वाशी वाहतुक शाखेच्या ठिकाणी दुर्गंधी पसरविणारे व मानवी आरोग्यास हानीकारक असलेले डेब्रीजने भरलेले ११ डंपर आढळून आले.

सदर डंपर हे मुंबई येथून डेब्रीज भरुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच उलवे जासई सिडको परिसरात खाली करण्यासाठी जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे आढळून आले. डंपर वरील चालक १) राजेश जगदिशसिंग पाल, वय ३५ वर्षे, रा. कन्होज, हुसेफूर, शिवराभाऊ, उत्तर प्रदेश सध्या रा. पत्रीपुल, झोपडपट्टी कल्याण जि. ठाणे २) विजयकुमार लालधन महातो, वय २४ वर्षे, रा. गॅरेज लाईन, सेक्टर २०, सीबीडी बेलापूर नवी मुंबई ३) कैलास लक्ष्मण कुलाल, वय ४० वर्षे, रा. खारकोपर, बजरंग मंदिराजवळ, उलवे नवी मुंबई व इतर यांना ताब्यात घेण्यात आले असून ताब्यात घेतलेल्या ११ डंपरचे क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
1) MH-48-BM-9153,2) MH-46-CL-7227,3) MH-46-CL-4037,4) MH-01-AA-3817,5) MH-43-CE-9567,6) MH-02-FG-9662,7) MH-46-BM-6535,
8) MH-43-BG-9478, 9) MH-47-Y-5695 10)MH-46-BM-9813, 11) MH-47-BL-5996असे एकुण ११ डंपर चालकांविरुध्द वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १५८/२०२४, भा.दं.वि. सं.क.२६९, ५११,३४ प्रमाणे दि. ०५/०४/२०२४ रोजी रात्रौ २३:०९ वा. गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

तसेच डंपर कमांक MH-46-CL-8030 वरील चालक मोहन आनंद प्रजापती, वय ३६ वर्षे, रा. भगोदर रोड, र.मु.आ. हाजारीबाग झारखंड हा पाडेघर रेल्वे क्रॉसिंग ब्रिज जवळ, उरण ते पनवेल रोड येथे डेब्रीजने भरलेला डंपर खाली करण्याच्या प्रयत्नात असताना दि. ०५/०४/२०२४ रोजी सायंकाळी १८:३० वाजता ताब्यात घेण्यात आला. सदर डंपर चालकाविरुध्द पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क. २२१/२०२४ भा.दं.वि.सं.क.२६९,५११प्रमाणे दि.०५/०४/२०२४ रोजी रात्रौ २३:०२ वाजता गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
सिडको परिक्षेत्रात अनधिकृत डेब्रीज टाकत असताना कोणी आढळल्यास सिडकोच्या www.cidco.maharashrta.gov.in या वेब साईटवर तसेच संबंधीत पोलीस ठाण्यात कळविण्यात यावे असे याव्दारे आवाहन करण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -