Friday, April 26, 2024
Homeदेशचीनमधील गाशा गुंडाळून ‘ॲपल’ येणार भारतात!

चीनमधील गाशा गुंडाळून ‘ॲपल’ येणार भारतात!

उत्पादन, व्यापार वृद्धी यावर देणार भर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीनंतर जगभरातील बाजारांमध्ये खळबळ उडाली असताना बिकट परिस्थितीत मात करीत आता भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारली असून सर्व बाबतीत सतत पुढे सरसावत आहे. उद्योग आणि बांधकाम क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत आहे.

त्याचाच परिणाम म्हणून जगातील सर्व प्रसिद्ध कंपन्यांच्या नजरेत भारत ही गुंतवणुकीसाठी सुरक्षित बाजारपेठ बनत आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्या अन्य देशांतून आपला व्यवसाय बंद करून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्नात आहेत. अशातच आता टेक जायंट कंपनी ‘ॲपल’ बाबतची एक मोठी माहिती पुढे आली आहे.

त्यानुसार ‘ॲपल’ चीनमधून आपला गाशा गुंडाळून दुसऱ्या देशात म्हणजेच भारतात येण्याचा विचार करत आहे. आपल्या उत्पादन वाढीसाठी भारत हा एक चांगला पर्याय असल्याचे कंपनीचे मत झाले आहे. भारताला पहिली पसंती- ‘ॲपल’ने त्यांच्या अनेक कंत्राटी उत्पादकांना चीनबाहेर उत्पादन वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, ‘ॲपल’ भारतात आणि व्हिएतनाममध्ये आपला व्यवसाय सुरू करण्याच्या शक्यतांचा विचार व अभ्यास करत असल्याची माहिती आहे.

‘ॲपल’च्या जागतिक उत्पादनात सध्या भारत आणि व्हिएतनामचा वाटा फारच कमी आहे. एका अंदाजानुसार, आयफोन, आयपॅड व मॅकबुक कंप्यूटर यांसारखी ९० टक्के ‘ॲपल’ उत्पादने चीनमध्ये स्वतंत्र उत्पादक तयार करतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -