Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीWeight Loss: दररोज आवळा खा, १ महिन्यात लठ्ठपणा करा कमी

Weight Loss: दररोज आवळा खा, १ महिन्यात लठ्ठपणा करा कमी

मुंबई: वजन वाढताच अनेक आजारांचा धोकाही वाढतो. यामुळे फिटनेसवर मोठा परिणाम होतो. लोक यापासून बचावासाठी खाणे कमी करतात अथवा फिजीकल अॅक्टिव्हिटी वाढवतात. वजन कमी करण्यासाठी खाणे कमी करे तसेच घाम गाळणे या जुन्या पद्धती झाल्या. आता तुम्ही स्मार्ट पद्धतीने वेट लॉस करू शकता. योग्य आहार, कॅलरीजचे सेवन आणि सामान्य शारिरीक अॅक्टिव्हिटीच्या मदतीने तुम्ही १ महिन्यात वजन कमी करू शकता.

यात तुम्हाला आवळ्याची मदत होऊ शकते. आवळा चवीला तुरट असतो. त्यामुळे आवळ्याचा ज्यूस पिणे लोक पसंत करतात. मात्र ज्यूसमधून तुम्हाला फायबर मिळत नाही आणि वजनही कमी होत नाही. अशातच आवळ्याचा चहा जास्त फायदेशीर आहे.

यासाठी एका भांड्यात ४ कप पाणी, १ चमचा आवळा पावडर, एक चमचा सुंठ घालून उकळा. हे पाणी एक कप होत नाही तोपर्यंत उकळा. यानंतर एका ग्लासात काढून घ्या. यात थोडेसे काळे मीठ आणि मध मिसळा. डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे खूप चांगले आहे.

आवळ्यामध्ये क्रोमियम आढळते जे जेवणानंतर वाढणाऱ्या शुगरला रोखते. डायबिटीजमध्ये हे अतिशय फायदेशीर असते. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. यात अँटीऑक्सिडंटही असतात जे चेहऱ्याची चमक वाढवण्यास मदत करतात. तसेच रक्तसुधारणाही होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -