Weekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ३ मार्च ते ९ मार्च २०२४

Share

साप्ताहिक राशिभविष्य, ३ मार्च ते ९ मार्च २०२४

उत्पन्नामध्ये वाढ
मेष :
हा कालावधी आपणास अत्यंत चांगला आहे. उद्योगातून आणि इतर धंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. नवीन संधी चालून येणार आहे. पालकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. दूरचे प्रवास संभवतात. परीक्षेत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडणार आहे. कुटुंबाकडून आपणास सहकार्य मिळेल. कोणतीही विपरित परिस्थिती समोर आली तरी आपण आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहात. कुटुंबामध्ये शुभवार्ता मिळतील. प्रगती होईल. कुटुंबामधील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येऊन त्यांना दिलासा मिळेल. सहकुटुंब धार्मिक ठिकाणी प्रवास कराल. आरोग्य उत्तम राहील. कोर्ट कायदेविषयक कार्य पुढे ढकलावीत.
अपेक्षापूर्ती होईल
वृषभ :
आपल्या अपेक्षेनुसार आपली कामे पार पाडण्यात यश मिळेल. अपेक्षापूर्ती होईल. बरेच दिवस एखादे महत्त्वाचे काम होण्याची आपण वाट पाहत होता, असे कार्य पूर्ण झाल्यामुळे उत्साहात व आनंदात वृद्धी होईल. मात्र कोणत्याही बाबतीत अतिरेक टाळा. थोड्या संयमाने शत्रूवर विजय प्राप्त करता येईल. मानपानाची प्रसंग येऊ शकतात, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. नैराश्य जाईल. कुटुंब परिवारात सुवार्ता मिळून वैयक्तिक भाग्योदय होईल. अचानक धनलाभाचे योग. व्यवसायिक पर्यायातून विशेष लाभ, काही फायद्याचे सौदी हाती येतील. त्यानुसार नियोजन बदलावे लागेल. आयात-निर्यात व्यवसायापासून रिटेल व्यवसायिकांच्या उलाढालीत वृद्धी होऊन नफ्याचे प्रमाण वाढेल. तांत्रिक ऑटोमोबाइल क्षेत्र विशेष लाभान्वित होईल. मंगलकार्य ठरू शकते.
कार्यमग्न राहा
मिथुन :
इतर कोणाच्याही आश्वासनांवर विसंबून राहणे म्हणजे नुकसानीस आमंत्रण दिल्यासारखे होईल. स्वतःचे कार्य स्वतः पूर्ण करा. चालढकल नको. आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी उपलब्ध होतील. नोकरी, व्यवसाय, धंद्यात अनुकूल परिस्थिती लाभेल. मात्र नोकरीच्या ठिकाणी गटबाजीपासून अलिप्त राहणे हिताचे ठरेल. आपल्या कामाविषयी ज्ञान अद्यावत ठेवा. कार्यमग्न राहा. इतरांच्या बोलण्याला बळी पडू नका, नंतर मनस्ताप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहिली तरी आर्थिक गरज भासू शकते. आर्थिक विवंचनेवर लगेचच कर्ज काढणे हा मार्ग शक्यतो अवलंबून नका. मित्र, कुटुंबाकडून सहकार्य लाभेल. शेअरसंबंधित व्यवसायात आर्थिक फायदा.
अधिकार कक्षा रुंदावतील
कर्क :
नोकरी-व्यवसाय-धंद्यात अनुकूलता लाभेल. नोकरीमध्ये वेतनवृद्धी, पदोन्नती यासारख्या घटना घटित होऊ शकतात. केलेल्या कामाचे, घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. उत्पन्नात वृद्धी होऊन नोकरीतील अधिकार कक्षा रुंदावतील. पण त्याचबरोबर जबाबदाऱ्याही वाढतील. सरकारी स्वरूपाच्या नोकरीत मानसन्मान मिळून अतिरिक्त कार्यभार सोपविला जाऊ शकतो. आपल्या अधिकार मर्यादेचे उल्लंघन करू नका. व्यवसाय धंद्यात तेजी वाढून नफ्याच्या प्रमाणात वृद्धी होईल. व्यवसाय विस्ताराच्या योजना हाती घेता येतील. नवे नियोजन करू शकाल. भागीदाराबरोबर मतभेद टाळणे इष्ट ठरेल. स्पर्धकांवर मात करू शकाल. तरुण-तरुणींचा अर्थार्जनाचा शुभारंभ होईल.
नव्या संकल्पना राबवू शकाल
सिंह :
काही वेळा विरोधकांचे मुद्दे पटणारे नसले तरी वाद-विवाद वाढवू नका. ते हिताचे ठरेल. थोडे सबुरीने व संयमाने घ्या. तसेच कुटुंब परिवारात आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. समोरील व्यक्तीच्या मतास उचित प्राधान्य देणे श्रेयस्कर ठरेल. नोकरीत, व्यवसाय-धंद्यात परिस्थिती समाधानकारक राहून नवे तंत्रज्ञान, नव्या संकल्पना राबवू शकाल. मानसन्मानात वृद्धी, सर्वच क्षेत्रातील समस्या जाणून घेतल्यास त्यावर मार्ग काढू शकाल. जीवनसाथीचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कोणत्याही स्वरूपाच्या लहान-मोठ्या कार्यात यश मिळण्यासाठी ग्रहमान तसेच वातावरण अनुकूल आहे.
कामे गतिशील होतील
कन्या :
अनुकूल कालावधी. हातात घेतलेल्या कार्यात यश. दीर्घकाळ रखडलेली जमीन-जुमला, स्थायी संपत्ती याविषयीची कामे गतिशील होतील. आर्थिक फायदा होऊ शकतो. आर्थिक बाजू चांगली राहिल्याने नवीन गुंतवणुकीचा विचार असेल; परंतु नवीन लहान मोठी कोणतीही गुंतवणूक करताना सतर्क राहणे जरुरीचे. गरज पडल्यास त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घ्यायला विसरू नका. पूर्वी केलेल्या गुंतवणुका भरघोस फायदा मिळवून देतील. सभा समारंभाची निमंत्रणे मिळतील. एखाद्या समारंभात मानाचे स्थान भूषवू शकाल. भागीदारी व्यवसायात वाद टाळा.
समाधान मिळेल
तूळ
:
आपण आनंदी आणि उत्साही वातावरणाचा लाभ घेऊ शकाल. आर्थिक ओघ मोठा राहून आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. त्यामुळे मनसोक्त खर्चही करू शकाल. कुटुंब, परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्याचे समाधान मिळेल. काही कार्यनिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. प्रवास कार्यसिद्ध राहतील जे जातक नोकरीच्या शोधात आहेत. अशा जातकांचा नोकरीविषयक शोध संपुष्टात येईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील. शिक्षणासाठी परदेशगमन होऊ शकते. चालू नोकरीत अनुकूल वातावरण लाभेल.
मार्गदर्शन लाभेल

वृश्चिक : हितशत्रूंवर या कालावधीमध्ये मात करू शकाल. मात्र थोडा संयम आवश्यक आहे. सबुरीने घ्या. कुटुंब परिवारातील परिस्थिती मतभेदांमुळे अस्थिर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या मतास उचित प्राधान्य द्या. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. नोकरीमध्ये आपण केलेल्या कार्याचा गौरव होऊन कौतुकास पात्र ठराल. घाईगर्दीत कोणताही लहान-मोठा निर्णय घेण्याचे टाळा. स्वतःच्या क्रोधावर, वागण्या-बोलण्यावर नियंत्रण आवश्यक राहील. कोणालाही अपमानास्पद वागणूक देऊ नका. नेमकी संधी ओळखून पुढील पावले उचला. महत्त्वाच्या कार्यासाठी नवीन जबाबदारी घ्यावी लागेल.

भौतिक सुख-सुविधांमध्ये वृद्धी
धनु : सदरील कालावधीमध्ये आपल्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वृद्धी होईल. त्याचबरोबर सामाजिक प्रतिष्ठा आणि यश, कीर्ती वाढेल. राहत्या घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च होईल. व्यवसाय-धंद्यात मोठे करारमदार होऊन काही फायद्याचे सौदे हाती येण्याची शक्यता. व्यावसायिक उलाढाल वाढेल. जमीन-जुमला स्थायी संपत्ती इत्यादींच्या खरेदी विक्रीतून लाभ, मात्र वादविवाद टाळा. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा मिळू शकतो. दीर्घकाळ रखडलेले व्यवहार गतिमान होऊन पूर्णत्वाच्या मार्गावर येतील.
महत्त्वपूर्ण बदल
मकर :
या काळात जरी आपल्याला मिश्र फळे मिळणार असतील तरी आपल्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. आपल्यासमोरील मोठी क्लिष्ट स्वरूपाची कार्य आपण आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर पूर्ण करू शकाल. नोकरीत अनुकूल कालावधी. पदोन्नती, वेतनवृद्धीचे योग. आपल्या भावंडांमुळे आपल्या कारकिर्दीमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात. आर्थिकदृष्ट्या पित्याकडून सहयोग प्राप्त होऊन आर्थिक परिस्थिती सुधारेल. सामाजिक कार्यात रस घ्याल. मान-सन्मान वाढेल. भूमी, भवन, प्रॉपर्टी यांच्यापासून मोठ्या आर्थिक लाभाची शक्यता. वैद्यकीय, बांधकाम क्षेत्राशी संबंधित जातकांना मोठे फायद्याचे सौदे हाती येण्याच्या शक्यतेसह नवीन संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी स्पर्धात्मक यश मिळवू शकतात.
यश संपादित करता येईल
कुंभ :
आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक. पथ्यपाणी सांभाळा. त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात प्रेमसंबंध दृष्टिकोन बदलाची शक्यता. मतभेद, वादविवाद यापासून अलिप्त राहा. आपल्यासमोरील कार्य पूर्ण करण्यासाठी अधिक परिश्रमाची आवश्यकता. आपल्या क्रोधावर वेळीच नियंत्रण ठेवा. मनस्वास्थ्य बिघडवणाऱ्या घटना घटित होऊ शकतात. बौद्धिक क्षेत्रातील जातकांना अनुकूल कालावधी घेतलेल्या कष्टाचे अपेक्षित फळ मिळू शकते. नोकरीत केलेल्या कामाचे चीज होईल. उत्पन्नात वृद्धी होण्याची शक्यता. एखाद्या प्रशिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी उपलब्ध होईल. नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतींमध्ये यश संपादित करता येईल.
अनपेक्षित घटना

मीन : सुरुवातीला रोजच्या जीवनात अनपेक्षित घटना घटित झाल्यामुळे आपल्या जीवनक्रमामध्ये बदल घडू शकतो. मनात गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. पूर्ण विचाराअंती व शांतचित्ताने आपल्यासमोरील परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणे योग्य ठरेल. यशप्राप्ती होईल. व्यवसाय-धंद्यात जुनी येणी वसूल होतील व सभेच्या वेळी वाद-विवाद नको. व्यावसायिक उलाढाल वाढेल. तिचा अनुभव घेता येईल. उत्सव, प्रदर्शन यशस्वी होऊन व्यवसायिक जुने संबंध नव्याने प्रस्थापित होतील. नवे अनुबंध जुळून येतील. नव्या संधींची उपलब्धता. शेअर मार्केट तसेच तेजी-मंदी संबंधित व्यवसायातून आर्थिक फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवनात शुभ घटना घटित होतील.

Recent Posts

Sangli Loksabha : सांगलीत मतदान केंद्रावर घडला ‘हा’ वादग्रस्त प्रकार

पोलीस आणि मतदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? सांगली : देशभरात होणाऱ्या लोकसभा…

8 mins ago

Chitra Wagh : तुमचं टायमिंग पाहता यामागे राजकीय हेतू आहे का?

मराठीसाठी आवाज उठवणाऱ्या रेणुका शहाणेंना चित्रा वाघ यांचा पत्रातून टोला मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या…

14 mins ago

Vidhan Parishad Election 2024 : लोकसभेनंतर महाराष्ट्रात लगेच होणार विधानपरिषद निवडणूक!

जाणून घ्या कोणत्या जागांवर आणि किती तारखेला होणार मतदान... मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची…

51 mins ago

RBI : आरबीआयची नवी नियमावली; कर्ज वाटपासंदर्भात कडक सूचना जाहीर!

कॅश लोनवर असणार 'हे' नवे नियम; जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : नवे आर्थिक वर्ष…

55 mins ago

Shivaji Park Meeting : ठाकरेंना मागे सारत शिवाजी पार्कवर होणार मनसेचीच सभा!

महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी १७ मे रोजी पहिल्यांदा एकत्र मंचावर येणार मुंबई…

1 hour ago

MP Loksabha Election : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ‘या’ चार मतदान केंद्रावर होणार फेरमतदान

जाणून घ्या नेमकं कारण काय? मध्य प्रदेश : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु…

2 hours ago