Thursday, May 2, 2024
Homeनिवडणूक २०२४Vote for BJP : भारताची उंचावलेली प्रतिमा कायम ठेवण्यासाठी भाजपाला मतदान करा

Vote for BJP : भारताची उंचावलेली प्रतिमा कायम ठेवण्यासाठी भाजपाला मतदान करा

ओरोसमध्ये केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

सिंधुनगरी : मला या जिल्ह्यातील जनतेने अनेक पदावर काम करण्याची संधी दिली. मला मिळालेल्या या पदांचा उपयोग जिल्हावासियांसाठी मी केला. दिल्लीपर्यंत एक केंद्रीय मंत्री म्हणून सक्षम नेतृत्व कायम ठेवले. या जिल्ह्याला, कोकणाला व महाराष्ट्राला एक राजकीय ताकद निर्माण करून दिली. देशाची सुरक्षितता, देशाची प्रगती, यासह देशातील गोरगरीब जनतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अनेक योजना व जगातील भारताची उंचावलेली प्रतिमा कायम ठेवण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करा, (Vote for BJP) असे आवाहन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ओरोस येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले.शुक्रवारी कुडाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा ओरोस जिल्हा परिषद कार्यकर्ता संवाद मेळावा शुक्रवारी इच्छापुर्ती गोविंद मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे, संदीप कुडतकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या भागाचे विद्यमान खासदार राऊत यांनी आपला ५७% खासदार फंड खर्च केला नाही. दहा टक्के कमिशनसाठी हा निधी खर्च झाला नाही. उलट माझा खासदार फंड या भागासाठी मी शंभर टक्के खर्च केला. विमानतळ, सीवल्ड, प्रकल्प रिफायनरी प्रकल्प अशा अनेक विकासात्मक योजनांना खासदार राऊत व उद्धव ठाकरे यांनी सातत्याने विरोध केला. अनेक रोजगार निर्माण करणारे हे प्रकल्प शिवसेनेच्या या नेत्यांमुळे रेंगाळले. मी मंत्री मुख्यमंत्री आता केंद्रीय मंत्री अशी अनेक पदे भूषविताना या पदांचा वापर मी या भागातील जनतेसाठी केला. जिल्ह्यातील जाणारा चौपदरी महामार्ग यासाठी मी मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारकडे मागणी केली. या जिल्ह्यात अनेक विकास कामे व सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांसाठी तब्बल ५४ योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने राबविल्या आहेत. विकासाचा हा आलेख आणखी उंचावत नेण्यासाठी आपली व देशाची प्रगती करण्यासाठी भाजपला मत द्या असे आवाहन ही नारायण राणे यांनी केले.

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप नेते संदीप कुडतरकर, भाजप महिला अध्यक्षा संध्या तेरेसे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सर्वांचे स्वागत मंडळ अध्यक्ष दादा साईल यांनी केले तर सुप्रिया वालावलकर यांनी आभार मानले.

शरद पवारांचे काम, उबाठा सेना संपविणे

राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांचा भाजपाला विरोध नाही तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यासाठी त्यांचे काम सुरू आहे याकडेही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरेंकडे पाच खासदारांची संख्या आहे. तर भाजपाकडे ३०३ खासदारांचे संख्याबळ आहे. आता तर भाजपचा चारशे पारचा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. गेल्या पाचशे वर्षात प्रभू रामचंद्रांचे मंदीर झाले नाही ते त्यांनी केले. धर्मस्थळे देव देवतांची मंदिरे याबाबत भाजपने फार मोठे काम केले. या नेतृत्वाला तडीपार करण्याची भाषा उद्धव ठाकरेंना शोभणारी तर नाहीच त्यांच्या याच नीतीमुळे शिवसेनेची अधोगती झाली. उद्धव ठाकरेंनी या कोकणासाठी या जिल्ह्यासाठी काय दिले ते जाहीर करावे, असे आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -