Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रगुंगीच्या औषधाचा विनापरवाना साठा जप्त, दोन जण ताब्यात

गुंगीच्या औषधाचा विनापरवाना साठा जप्त, दोन जण ताब्यात

नाशिक (प्रतिनिधी) : सुरत येथून मालेगाव येथे विनापरवाना गुंगीचे औषध घेऊन येणाऱ्या इसमास मालेगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत नाशिकचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक प्रशांत विठ्ठल ब्राह्मणकर यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी मुक्तार अहमद महंमद अरमान याने इम्रान मोटवा याच्या सांगण्यावरून सुरत येथील अज्ञात इसम याच्याकरवी सुरत येथून ५० हजार ४०० रुपये किमतीच्या अल्प्राकॅन टॅबलेटच्या १४० स्ट्रीप, रेक्सॉन टी या औषधाच्या ११ हजार ४८० रुपये किमतीच्या सिलबंद बाटल्या, सहा हजार रुपये किमतीच्या कॉडीक्युअर टी या औषधाच्या बाटल्या, तसेच कोनेक्स सी नावाच्या ११६प्लास्टिकच्या सिलबंद बाटल्या, तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ८७हजार १२० रुपये किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आला.

ही गुंगीकारक औषधे मालेगावमध्ये लोकांना विक्री करण्याकरिता विनापरवाना विनाखरेदी बिल कायदेशीररीत्या बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपी मालेगाव येथे घेऊन येत असताना मिळून आला. यावेळी पथकाने केलेल्या कारवाईत आरोपी मुक्तार अहमद महंमद अरमान (रा. मालेगाव) याला अटक करण्यात आली असून, इम्रान मोटवा (रा. मोहनबाबानगर) व अन्य एक आरोपी अज्ञात इसम फरारी झाले आहेत. या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात अन्न व औषध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -