Monday, May 6, 2024
Homeमहामुंबईप्रकल्पाला विरोध करायचा असल्यास उद्धव ठाकरे यांच्याकडे रेटकार्ड तयार

प्रकल्पाला विरोध करायचा असल्यास उद्धव ठाकरे यांच्याकडे रेटकार्ड तयार

आमदार नितेश राणे यांचा आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात प्रकल्प येतात, तेव्हा त्याला विरोध करायचा असेल, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे एक रेट कार्ड तयार आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

ते म्हणाले की, उद्धव ठाकरे पाहिजे असतील, तर इतके कोटी दिले पाहिजे, उद्धव किंवा आदित्य पाहिजे असल्यास किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य पाहिजे असल्यास आणखी काही कोटी द्यावे लागतील. उद्धव यांच्या बरोबर १० हजार सैनिक पाहिजे असल्यास इतके कोटी द्यावे लागतील, असे हे रेटकार्ड त्यांच्याकडे तयार आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात असे प्रकल्प येतात, तेव्हा त्यांची माणसे समोरच्या लोकांशी ज्यांना विरोध करायचा अशा लोकांशी उद्धव ठाकरे यांची माणसे संपर्क साधून असा प्रकल्प रोखायचा असेल, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे रेटकार्ड तयार आहे.

जे लोक उद्धव ठाकरे यांच्याशी कमिटमेंट करतील, त्यांच्यासाठी ते तेथे जाऊन भाषण करतील आणि प्रकल्प बंद पाडतील व तुम्हाला फायदा मिळवून देतील, असेही त्यांची माणसे सांगतात. देशविरोधी ताकदींना सपोर्ट करण्याचे काम ठाकरे व त्यांची वसुली गँग करीत आहे, असा आरोपही आमदार नितेश राणे यांनी यावेळी केला.

दरम्यान महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात केरळ स्टोरी घडत असून हिंदू भगिनींना लव्ह जिहादच्या नावावर त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणाले, केरळ हे केवळ एक उदाहरण आहे. केरळमध्ये ३२ हजार मुली गायब झाल्या आहेत. महाराष्ट्राचेही उदाहरण दिल्यास केरळप्रमाणेच येथेही घडत आहे. लव्ह जिहादच्या नावावर मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे. देशात हिंदूंविरोधी मोठे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जे जिहादी लोक आहेत, त्यांना हिंदुस्तानला २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे, त्यासाठी हे सर्व प्रयत्न चाललेले आहेत, असेही आ. नितेश राणे यावेळी म्हणाले. केरळ स्टोरी थिएटरमध्ये जाऊन पाहा, अशी विनंतीही त्यांनी देशवासीयांना केली. सत्यता काय आहे, ते पाहा. हा काही राजकीय मुद्दा नाही, असे सांगून याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -