Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीUday Samant : गाडीवर झालेल्या दगडफेकीनंतर समोर आली उदय सामंतांची प्रतिक्रिया

Uday Samant : गाडीवर झालेल्या दगडफेकीनंतर समोर आली उदय सामंतांची प्रतिक्रिया

यवतमाळ येथे सामंतांच्या गाडीवर करण्यात आला होता हल्ला

मुंबई : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीतील सर्वच नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी मेळावे, प्रचारसभा, बैठका घेतल्या जात आहेत. त्यातच काल यावतमाळ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) सभेदरम्यान मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या ताफ्यातील वाहनावर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला. यानंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, मंत्री उदय सामंत उपस्थित होते. ही सभा सुरू असताना पार्किंगमध्ये उभे असलेल्या उदय सामंत यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगड मारून काच फोडण्याचा प्रयत्न केला. या दगडफेकीत त्यांच्या गाडीचा समोरील बाजूची काच फुटली आहे. ही बाब सभा संपल्यानंतर लक्षात आली.

गाडीवर हल्ला झाल्याचे लक्षात आल्यावर काही वेळासाठी तणाव निर्माण झाला. हल्ला झाला त्यावेळी गाडीमध्ये कोणीही नव्हते, दगडफेक नेमक्या कोणत्या व्यक्तीने केली हे कळले नसून पुढील तपास राळेगाव पोलीस करीत आहे. यवतमाळमधील राळेगाव येथील प्रचारसभेवेळी ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनेची दखल घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे. उदय सामंत त्यांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गाडीत पुढे रवाना झाले.

या संपूर्ण घटनेबाबत उदय सामंत म्हणाले, हल्ल्यात कुणालाही दुखापत झालेली नाही. मी या कारमध्ये नसल्याने सुखरूप आहे. हा हल्ला का, कशासाठी, काय उद्देश्याने झाला, कुणी दगड मारला हे कळालेले नाही, असं उदय सामंत म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -