Sunday, May 5, 2024
Homeदेशबोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने उचललं 'हे' पाऊल

बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने उचललं ‘हे’ पाऊल

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीपासून होणार लागू

नवी दिल्ली : निवडणुकीदरम्यान अनेकदा बोगस मतदान होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि निपक्षपातीपणे मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सध्या त्याबाबत चाचपणी सुरु आहे. याची अंमलबजावणी यंदा होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपासून होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोग यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. यात मतदानानंतर मतदाराच्या बोटावर पारंपरिक शाईऐवजी लेझरची खूण करण्यात येईल. ही खूण अनेक दिवस तशीच राहील, ती हटवणे शक्य होणार नाही. त्यामुळे व्यक्ती पुन्हा मतदान करायला आल्यास पकडला जाईल.

त्याचबरोबर ईव्हीएम मशीनला एक कॅमेरा लावण्यात येईल, ज्यात मतदानादरम्यान मतदाराचा फोटो काढला जाईल. एखादा व्यक्ती पुन्हा मतदान करायला आल्यास हा कॅमेरा त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याबद्दलचा अलर्ट अधिकार्‍यास पाठवेल.

या दोन्ही गोष्टींचे सध्या परीक्षण सुरु आहे. लवकरच त्या लागू करण्यात येतील आणि त्यामुळे बोगस मतदानाला आळा बसेल, असा विश्वास निवडणूक आयोगाला वाटतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -