Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणदापोली पोलीस ठाण्याच्या आग प्रकरणी पोलीस अधीक्षकांची भूमिका संशयास्पद - निलेश राणे

दापोली पोलीस ठाण्याच्या आग प्रकरणी पोलीस अधीक्षकांची भूमिका संशयास्पद – निलेश राणे

रत्नागिरी : दापोली पोलीस ठाण्याला काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीच्या घटनेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांची भूमिका संशयस्पद असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. रत्नागिरीच्या कारागृहात असलेल्या प्रदीप गर्ग या कैद्याचा एसपींशी कोणता संबंध आहे, असा सूचक सवाल निलेश राणे यांनीउपस्थित केला आहे.

गेल्या १४ मे रोजी सकाळी दापोली पोलीस ठाण्याच्या इमारतीला आग लागली. त्यामध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून गेली. गेल्या दीड वर्षापासून दापोली पोलीस ठाणे महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यवर्ती आहे. याच तालुक्यातील आसूद येथे पालकमंत्री अनिल परब यांनी अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचे आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर गुन्हा दखल करण्याची मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची कागदपत्रे या दापोली पोलीस ठाण्यात असताना आणि हे प्रकरण शेवटच्या टप्प्यावर असताना तेथील कागदपत्रे १४ मे रोजी लागलेल्या आगीत जाळून गेल्याची भीती स्वतः किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.

याचवेळी माजी खासदार निलेश राणे यांनी डॉ. गर्ग यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. एसपींचे सरकारी निवासस्थान दापोलीपासून ४ तासांच्या अंतरावर असताना एसपी आग लागल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात घटनास्थळी कसे पोहोचले, पोलीस ठाण्याला आग लागणार याची माहिती त्यांना होती का, असा थेट सवाल श्री. राणे यांनी व्यक्त केला आहे.

पालकमंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्ट प्रकरणी गेल्या दोन महिन्यांपासून एसपींच्या दापोली फेऱ्या का वाढल्या, दापोलीत सरकारी निवासस्थानाऐवजी खासगी रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या एसपींची बिले, त्यांचा खर्च कोण भागवते, त्यांच्या रत्नागिरीतील कार्यालयच्या नूतनीकरणासाठी मटेरियल कोणी दिले, त्याची बिले कोण भरते? पोलीस वेल्फेअर फंडाचा पैसा गर्ग कुठे वळवताहेत, असे सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

रत्नागिरीच्या कारागृहात प्रदीप गर्ग नावाचा फसवणुकीच्या प्रकरणात दाखल झालेल्या कैद्याला गर्ग या आडनावामुळे विशेष वागणूक मिळत आहे. त्याचा एसपी श्री. गर्ग यांच्याशी काय संबंध आहे, हेसुद्धा आपण लवकरच उघड करणार असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -