Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेचप्पल-बूट शिवण्याच्या कामात वडिलांना मिळाला लेकीचा हातभार

चप्पल-बूट शिवण्याच्या कामात वडिलांना मिळाला लेकीचा हातभार

कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली मनपाच्या माध्यमातून मिळालेल्या गटई स्टॉलमध्ये पादत्राणे विक्रीसह, चप्पल-बूट शिवून देत आपल्या रोजगाराच्या कमाईतून संसाराचा गाडा चालविणाऱ्या ज्येष्ठ नागरिक विजय अभंग यांना सद्यस्थितीत दृष्टी कमजोर झाल्याने काम करताना अडचण होत होती. यामुळे ग्राहकांना पादत्राणे उशिरा दुरूस्ती करून मिळत असल्याने ग्राहकांची संख्या कमी होऊ नये म्हणून आपल्या वडिलांना पादत्राणे व्यवसायात हातभार लावण्यासाठी मुलगी सुलोचना कदम हिने पुढाकार घेत मनपा मुख्यालयाच्या रस्त्यालगत असलेल्या ‘दुर्वास’ चप्पल बूट स्टॉलवर आपल्या वडिलांचा व्यवसायाचा गाडा हाकत आहे.

या कामातून त्या कुटुबांचा रोजगारदेखील कायम राहिला आहे. कोल्हापूरी चप्पलचा पॅर्टन कसा बनवितात, हे शिकून ती मुलगी देखील कोल्हापुरी चपला बनवित आहे. आजची महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. आपणही कामाच्या बाबतीत मागे नसल्याचे ती दाखवून देत असून चूल आणि मूल याबरोबरच रोजगाराद्वारे आपल्या कुटुंबाला हातभार लावित आहे.

सुलोचना कदम यांनी सांगितले की, पारंपरिक पादत्राणे यांना तशी कमी मागणी असते. परंतु झगमगाट असलेल्या शू मॉलच्या तुलनेत आम्ही पादत्राणे माफक दरात विक्री करीत असलो तरी ग्राहक हा आणखी कमी किंमतीत कसे पादत्राणे मिळतील, याकडे त्यांचा कल असतो. महिलांनी दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा आपण व्यवसाय सुरू करून मालक बनून आपला रोजगार मिळविला पाहिजे. तसेच आपण स्वयंसिध्दा असल्याचे दाखविले पाहिजे. कुठेल्याही लघुउद्योगाचे काम करताना त्यात लाज न बळगता काम करीत पुढे आपल्या व्यवसायाला भरारी देत आपली आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेही सुलोचना यांचे म्हणणे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -