Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीSwiggy Pawlice: स्विगीचे डिलिव्हरी बॉय आता हरवलेले प्राणीही शोधणार

Swiggy Pawlice: स्विगीचे डिलिव्हरी बॉय आता हरवलेले प्राणीही शोधणार

स्विगीने काढले ‘हे’ नवे फीचर

मुंबई : स्विगी (Swiggy) ही आजवर फूड डिलिव्हरी म्हणजेच अन्नपदार्थ घरपोच पोहोचवणारी कंपनीने ग्राहकांसाठी बऱ्याच सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यात स्विगीने आणखी एक नव्या उपक्रमाची भर घातली आहे. आता स्विगी फूड डिलिव्हरीसोबत तुमचे हरवलेले पाळीव प्राणीही शोधून देण्यास मदत करणार आहे. या सुविधेला ‘स्विगी पॉलीस’ (Swiggy Pawlice) असे नाव देण्यात आले आहे.

असे करणार ‘स्विगी पॉलीस’ काम-

  • तुमच्या हरवलेल्या पाळीव प्राण्याची माहिती (फोटो, नाव, ओळख इत्यादी) तुम्ही स्विग्गीच्या अ‍ॅपमध्ये अपलोड करू शकता.
  • यानंतर स्विगीच्या डिलिव्हरी पार्टनर्सना ही माहिती शेअर केली जाईल. देशभरात त्यांचे तब्बल ३.५ लाखाहून अधिक डिलिव्हरी पार्टनर्स आहेत. हे डिलिव्हरी बॉय ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी ठिकठिकाणी जात असतात. त्यामुळे त्यांची मदत यासाठी घेतली जाऊ शकते.
  • एखाद्या डिलिव्हरी पार्टनरला हरवलेला पाळीव प्राणी दिसला तर ते पेट्स स्वत: ताब्यात न घेता कंपनीला याबाबत माहिती देतील.
  • पेट्सना रेस्क्यू करण्यासाठी स्विगीने खास टीम तयार केली आहे. ही टीम लोकेशनला जाऊन ते पेट्स ताब्यात घेईल. यानंतर ही टीम पेट्सच्या मालकांना संपर्क साधेल आणि त्यांना त्यांच्या घरी सोडेल.

स्विग्गी फूड मार्केटप्लेसचे सीईओ रोहित कपूर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले, की ‘माझ्याकडे देखील पेट्स आहेत. एक पेट पॅरेंट म्हणून मला माहिती आहे की पेट्स हरवल्यानंतर किती काळजी आणि चिंता वाटते. अशी वेळ खरंतर कोणत्याही पेट पॅरेंट्सवर येऊ नये. मात्र, असे झालंच तर स्विगी पॉलीस हे तुमच्या मदतीसाठी कधीही तत्पर असतील’, असे रोहित कपूर यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -