Friday, May 3, 2024
Homeमहत्वाची बातमीKho-Kho : सूरज लांडे, रेश्मा राठोड यांच्याकडे महाराष्ट्राच्या खो-खो संघाचे नेतृत्व

Kho-Kho : सूरज लांडे, रेश्मा राठोड यांच्याकडे महाराष्ट्राच्या खो-खो संघाचे नेतृत्व

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची गटवारी जाहीर

उस्मानाबाद (वार्ताहर) : भारतीय खो-खो (Kho-Kho) महासंघाच्या मान्यतेने व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने उस्मानाबाद येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची जोरदार तयारी केली आहे. महाराष्ट्राच्या पुरुष संघाचे नेतृत्व सूरज लांडेकडे, तर महिला संघाचे कर्णधारपद रेश्मा राठोड हिच्याकडे देण्यात आले आहे.

गटवारी :

पुरुष गट : ए : रेल्वे, छत्तीसगड, मणीपुर, दादरा-नगर हवेली, अरुणाचल प्रदेश; बी : महाराष्ट्र, मध्य भारत, मध्य प्रदेश, उत्तराखंड, अंदमान-निकोबार; सी : कोल्हापूर, गुजरात, उत्तर प्रदेश, त्रिपुरा मेघालय; डी : कर्नाटक, पुदूचेरी, झारखंड, आसाम, नागालँड; इ : केरळ, तेलंगणा, गोवा, हिमाचल प्रदेश, सिक्किम; एफ : प. बंगाल, ओडिशा, हरीयाणा, चंदिगड, सीमा सुरक्षा बल, जी : विदर्भ, तामिळनाडू, पंजाब, जम्मू-कश्मीर व इंडियन तीबेट बॉर्डर पोलीस; एच : दिल्ली, आंध्र प्रदेश, राजस्थान व बिहार.

महिला गट : ए : महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार; बी : भारतीय विमान प्राधिकरण, राजस्थान, सिक्किम, आसाम; सी : कर्नाटक, विदर्भ, छत्तीसगड, त्रिपुरा, चंदिगड; डी : हरीयाणा, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, मेघालय, इ : कोल्हापूर, तामिळनाडू, पुदूचेरी, जम्मू-कश्मीर, नागालँड; एफ : पंजाब, प. बंगाल, झारखंड, गोवा, सीमा सुरक्षा बल; जी : ओडिशा, गुजरात, मध्य भारत, मणीपूर, इंडियन तीबेट बॉर्डर पोलीस; एच : दिल्ली, केरळ, दादरा-नगर हवेली, उत्तराखंड.

पुरुष संघ : अनिकेत पोटे, निहार दुबळे, अक्षय भांगरे, ॠषिकेश मुर्चावडे (सर्व मुंबई उपनगर); प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, आदित्य गणपुले (सर्व पुणे); लक्ष्मण गवस, गजानन शेंगाळ (सर्व ठाणे), सुरज लांडे (कर्णधार), अक्षय मासाळ (सर्व सांगली); रामजी कश्यप (सोलापूर), दिलीप खांडवी (नाशिक), सुरज शिंदे (हिंगोली), सनी नायकवडी (उस्मानाबाद); प्रशिक्षक : शिरीन गोडबोले (पुणे), व्यवस्थापक : नरेंद्र रायलवार (हिंगोली), फिजीओ : डॉ. किरण वाघ (अहमद नगर).

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना मानद डॉक्टरेट प्रदान

महिला संघ : प्रियांका इंगळे, काजल भोर, स्नेहल जाधव, दिपाली राठोड (सर्व पुणे); रुपाली बडे, पूजा फरगडे, रेश्मा राठाडे (कर्णधार) (सर्व ठाणे); संपदा मोरे, अश्विनी शिंदे, गौरी शिंदे (सर्व उस्मानाबाद); अपेक्षा सुतार, श्रेया सनगरे, आरती कांबळे (सर्व रत्नागिरी); प्रतिक्षा बिराजदार (सांगली), प्रिती काळे (सोलापूर); प्रशिक्षक : प्रविण बागल (उस्मानाबाद), व्यवस्थापिका : माधुरी कोळी (ठाणे); सहाय्यक प्रशिक्षक : प्राची वाईकर (पुणे).

राष्ट्रीय खो-खो पंच परीक्षा २४ नोव्हेंबरला

या स्पर्धेदरम्यान राष्ट्रीय खो-खो पंच परीक्षा २४ नोव्हेंबरला उस्मानाबादला होणार असून या पंच परीक्षेसाठी प्रशांत पाटणकर (९९६७५६२४६६) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अॅड. गोविंद शर्मा यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -