Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीThackeray Gat Petitions : ठाकरे गटाच्या याचिकांसाठी सुप्रीम कोर्टाची नकारघंटा!

Thackeray Gat Petitions : ठाकरे गटाच्या याचिकांसाठी सुप्रीम कोर्टाची नकारघंटा!

याचिकेबाबत कोणताही दिलासा मिळालेला नाही…

मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray Gat) खासदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या विषयावर तसेच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष तसेच निवडणूक आयोगाला द्यावेत अशी विनंती एका याचिकेद्वारे केली होती. याबाबतच्या सुनावणीस सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणीसाठी नकार दिला आहे. त्याचबरोबर निश्चित तारीख देण्यासही कोर्टानं नकार दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला याचिकेबाबत कोणताही दिलासा मिळालेला नाही.

यावेळी अधिवक्ता अमित आनंद तिवारी (Advocate Amit Anand Tiwari) यांनी म्हटलं की, “कोर्टानं हे प्रकरण ३१ रोजी सूचीबद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या हे प्रकरण घटनापीठाच्या निकालात समाविष्ट आहे. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनी जम्मू आणि काश्मीरवरील घटनापीठ संपेपर्यंत प्रतिक्षा करण्यास सांगितले आहे. तसेच यानंतर तुम्हाला तारीख देण्यात येईल, असे म्हटले आहे.

यावर पुन्हा तिवारी म्हणाले की, ही याचिका तातडीची याचिका आहे. यावर चंद्रचूड म्हणाले, ही याचिका धनुष्य आणि बाणाच्या चिन्हाबद्दल आहे बरोबर? आम्हाला ती ऐकावी लागेल. घटनापीठासाठी प्रतीक्षा करा, आम्ही याची यादी तयार करू. त्यामुळे या निकालासाठी ठाकरे गटाला प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -