Saturday, May 11, 2024
Homeमहत्वाची बातमीLoksabha Election : माझं तिकीट कापलं जावं यासाठी मी प्रयत्न करतोय

Loksabha Election : माझं तिकीट कापलं जावं यासाठी मी प्रयत्न करतोय

सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केली लोकसभा निवडणूक न लढवण्याची इच्छा

चंद्रपूर : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) वारे वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्ष (Political Parties) आपापला उमेदवार जाहीर करण्यासाठी बैठकांवर बैठका घेत आहेत. यामध्ये उमेदवारीसाठी पक्षांतर्गत धुसफूस असल्याचेही चित्र आहे. मात्र, एका नेत्याने चक्क तिकीट कापलं जावं यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असताना या नेत्याने लोकसभा निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आहेत. आज चंद्रपूरमध्ये (Chandrapur) एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही भावना व्यक्त केली.

दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी काल भाजपची बैठक पार पडली. याबाबत प्रश्न विचारला असता सुधीर मुनगंटीवार म्हणाले, लोकसभेसाठी महाराष्ट्रातल्या उमेदवारांची यादी येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होईल. भाजपच्या एकूण २५ जागा आहेत. त्याबाबत निर्णय आमचे वरिष्ठ घेतील.

चंद्रपूरसाठी मुनगंटीवार यांचं नाव अंतिम करण्यात आल्याची चर्चा होती, यावर बोलतना मुनगंटीवार म्हणाले, माझं नाव पक्षाने सुचवलं आहे आणि आग्रह केला आहे. पण मी माझं तिकीट कापलं जावं यासाठी प्रयत्न करतोय. वरिष्ठांची इच्छा आहे की मी एक छोटासा वाटा उचलावा, पण माझ्या मते माझी जास्त मदत आणि उपयोग राज्याला होणार आहे. मी निश्चित केलेले अनेक प्रकल्प अजून अपूर्ण आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, असं ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -