Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीPune bandh : पुणे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Pune bandh : पुणे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : मराठा संघटना संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि विरोधी पक्षांसह सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरांनी मंगळवारी पुणे बंद (Pune bandh) पाळला आहे. यादरम्यान मूकमोर्चा काढण्यात आला. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केल्यानंतर मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले हे देखील सहभागी झाले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला.

अनेक सामाजिक, व्यापारी संघटनांचा बंदला पाठिंबा मिळाला आहे. फेडरेशन ऑफ ट्रेडर्स असोसिएशन ऑफ पुणे (एफएटीपी) चे अध्यक्ष फतेहचंद रांका म्हणाले होते, “आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि व्यापाऱ्यांना बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो.” सर्व दुकाने आणि कार्यालये दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहतील.

मोर्च्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लाल महाल याठिकाणी मोर्चाचा समारोप केला जाणार आहे. विविध संघटनांनी आजच्या पुणे बंदला पाठिंबाही दिला आहे. यावेळी पुण्यातील मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -