Friday, May 3, 2024
Homeमहत्वाची बातमीव्हीआयपी नंबरसाठी सोलापूरकरांनी केवळ तीन महिन्यांत मोजले १ कोटी ३ लाख रुपये

व्हीआयपी नंबरसाठी सोलापूरकरांनी केवळ तीन महिन्यांत मोजले १ कोटी ३ लाख रुपये

सोलापूर (हिं.स) : आवडत्या व लकी क्रमांक घेण्यासाठी लोकांची पसंती दिसुन येत आहे. व्हीआयपी नंबरसाठी आरटीओकडे मोजलेल्या रकमेवरून हे स्पष्ट होते. मागील तीन महिन्यांत सोलापूरकरांनी चक्क एक कोटी तीन लाख आठ हजार मोजून व्हीआयपी नंबर घेतले आहे. यातून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला चांगला महसूल मिळाला आहे.

कोरोना काळात व्हीआयपी नंबरसाठी असलेली मागणी बऱ्यापैकी घटली होती. मात्र या वर्षभरात या आवडत्या पसंतीच्या क्रमांकाना पुन्हा मागणी वाढली आहे. मार्च ते जुलै २०२२ पर्यंत दुचाकी तसेच चारचाकी गाड्यासाठी अधिक रक्कम मोजून व्हीआयपी नंबर घेण्यात आले. यासाठी पाच हजारापासून ३ लाखांपर्यंत सोलापूरकरांनी मोजली आहे.

व्हीआयपी नंबरसाठी एक आकडी अंकाला सर्वाधिक रक्कम आहे. त्यासाठी ३ लाख मोजावे लागतात. पण आवडत्या आणि लकी अंकासाठी लोक तयार असतात. हे आकडेवारीवरुन दिसून येते. त्यानंतर तीन शून्य आणि एक आकडा असणाऱ्या नंबरला अधिक मागणी आहे. त्याला दीड लाख मोजावे लागतात. त्यानंतर व्हीआयपी नंबरनुसार ७० हजार, ५० हजार, १५ हजार, ७५०० आणि ५ हजार रुपये मोजावे लागतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -