Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीभाजपाच्या सहा याद्या जाहीर; ४०५ उमेदवारांची घोषणा

भाजपाच्या सहा याद्या जाहीर; ४०५ उमेदवारांची घोषणा

नवी दिल्ली : भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या सहा याद्या जाहीर केल्या आहेत. या याद्यांमधून भाजपाने ४०५ उमेदवारांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील २३ उमेदवारांचा समावेश आहे. भाजपाने २०१९ मध्ये लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ पैकी २५ जागा लढवल्या आणि २३ जिंकल्या होत्या. यंदा भाजपाने राज्यातील २३ उमेदवारांची घोषणा केली आहे. राज्यातल्या आणखी काही जागांवरील भाजपाच्या उमेदवारांची घोषणा गुरुवार २८ मार्च २०२४ रोजी होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

भाजपाची पहिली यादी १९५ उमेदवार
भाजपाची दुसरी यादी ७२ उमेदवार
भाजपाची तिसरी यादी ९ उमेदवार
भाजपाची चौथी यादी १५ उमेदवार
भाजपाची पाचवी यादी १११ उमेदवार
भाजपाची सहावी यादी ३ उमेदवार

भाजपाने पाचव्या यादीतून महाराष्ट्रातील तीन उमेदवारांची घोषणा केली
भाजपाने दुसऱ्या यादीतून महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची घोषणा केली

भाजपाची सहावी यादी – तीन उमेदवारांची घोषणा

राजस्थान
करौली – धौलपूर – इंदूदेवी जाटव
दौसा – कन्हैयालाल मीणा

मणिपूर
इनर मणिपूर – थौनाओजम बसंतकुमार सिंह

भाजपाचे महाराष्ट्रातील उमेदवार
भंडारा – गोंदिया – सुनिल मेंढे
गडचिरोली – चिमूर – अशोक नेते
सोलापूर – राम सातपुते
नंदुरबार – हिना गावित
धुळे – सुभाष भामरे
जळगाव – स्मिता वाघ
रावेर – रक्षा खडसे
अकोला – अनुप धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
नांदेड – प्रतापराव पाटील चिखलीकर
जालना – रावसाहेब दानवे पाटील
दिंडोरी – भारती पवार
भिवंडी – कपिल पाटील
उत्तर मुंबई – पियुष गोयल
ईशान्य मुंबई – मिहीर कोटेचा
पुणे – मुरलीधर मोहोळ
अहमदनगर – सुजय विखे पाटील
बीड – पंकजा मुंडे
लातूर – सुधाकर श्रृंगारे
माढा – रणजीतसिंह नाईक निंबाळकर
सांगली – संजय पाटील

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -