Sunday, May 5, 2024
Homeमहत्वाची बातमीअनिल परब यांचे दापोलीतील अनधिकृत रिसॉर्ट तोडण्यासाठी कारणे दाखवा नोटिस

अनिल परब यांचे दापोलीतील अनधिकृत रिसॉर्ट तोडण्यासाठी कारणे दाखवा नोटिस

मुंबई : भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने ठाकरे सरकारचे मंत्री अनिल परब यांनी दापोली येथिल मुरुड समुद्र किनाऱ्यावर २ अनधिकृत रिसॉर्ट बांधले. भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकार्यांनी जून २०२१ मध्ये या दोन्ही अनधिकृत रिसॉर्टची पाहणी केली होती, त्याचा अहवाल केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला पाठवला होता, त्या अंतर्गत ही कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा रिसॉर्ट पाडण्याचे अंतिम आदेश येईल, असा विश्वास डॉ. सोमैया यांनी व्यक्त केला आहे.

समुद्र किनाऱ्यावरील ना विकास क्षेत्र (No Development Zone) सीआरझेड सीमेच्या आत,

साई रिसॉर्ट एन एक्स, गाव मुरुड, दापोली

सी कौंच बीच रिसॉर्ट , गाव मुरुड, दापोली

हे अनधिकृतरित्या बांधले ते तोडण्यासंबंधीची नोटिस भारत सरकारद्वारे १७ डिसेंबर २०२१ रोजी पाठवण्यात आली आहे.

• या नोटीस मध्ये १५ दिवसांच्या आत कारणे दाखवा नोटीसचे उत्तर देण्याचे सांगण्यात आले आहे.

• सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून ना विकास क्षेत्र (No Development Zone) मधील हे दोन्ही बांधकाम आहे.

• NCSCM, SCZCM यांचे सीआरझेड ३ संबंधीचे नकाशे ही साई रिसॉर्ट एन एक्स, सी कौंच बीच रिसॉर्ट वर श्री. अनिल परब यांना पाठवण्यात आले आहे.

• साई रिसॉर्ट एन एक्स हे दोन मजली अनधिकृत रिसॉर्ट आहे व सी कौंच बीच रिसॉर्ट हा तळ मजला पहिला मजला आणि दुसऱ्या मजल्यावरील स्ट्रक्चर कव्हर करण्यात आले आहे.

• या रिसॉर्ट मध्ये प्रवेश करण्यासाठी समुद्राच्या वाळूतून अनधिकृत रस्ता दिला गेला आहे.

• सीआरझेड नोटिफिकेशन २०११ चे कलम ८ च्या अंतर्गत ही नोटीस देण्यात आली.

गेल्या २/३ वर्षात हे बांधकाम करण्यात आले, याचे सॅटेलाईट नकाशे व पुरावे ही नोटीस सोबत देण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -